राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- रा हुरी फॅक्टरी येथील आदर्श नागरी पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयात आज गणपती बाप्पांची विधिवत पूजन करून मोठ्या उत्साहात ...
राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-
सर्वत्र गणेशोत्सवास मोठा उत्साहाने प्रारंभ होत असताना आदर्श नागरी पतसंस्थेचे संस्थेचे चेअरमन सुधाकर कदम व सुजाता कदम तसेच संस्थेचे संचालक भारत चोथे व त्यांच्या सुविधपत्नी स्वाती चोथे यांच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात आले. यावेळी पौरोहित्य प्रवीण नवले गुरु यांनी केले.
प्रसंगी आदर्श पतसंस्थेचे मार्गदर्शक तथा जेष्ठ संचालक अण्णासाहेब चोथे, पतसंस्थेचे चेअरमन सुधाकर कदम,व्हा चेअरमन आबासाहेब वाळुंज,माजी नगरसेविका सुजाता कदम,संस्थेचे संचालक भारत चोथे,मारुती खरात,मॅनेजर ज्ञानेश्वर सोनवणे,दत्तात्रय मोरे गणपत शिंदे,संभा हरगुडे,विकास शेटे,ज्ञानेश्वर शिंदे आदींसह कर्मचारी बांधव उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत