राहुरी फॅक्टरी (प्रतिनिधी) : महिलांसोबत आज जगभरात वाढत असलेल्या गुन्हेगारी व अत्याचाराच्या घटना या अनुषंगाने आज राहुरी फॅक्टरी येथील डि प...
राहुरी फॅक्टरी (प्रतिनिधी) :
महिलांसोबत आज जगभरात वाढत असलेल्या गुन्हेगारी व अत्याचाराच्या घटना या अनुषंगाने आज राहुरी फॅक्टरी येथील डि पॉल शाळेतील विद्यार्थ्यांसाठी गुड टच व बॅड टच कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. सदर प्रसंगी इयत्ता ९ वी च्या विद्यार्थ्यांनी चालू घटनेवर आधारीत पथनाट्य, नाटिका ,व कविता सादर केल्या, तसेच सदरच्या कार्यशाळेतून शाळेतील विद्यार्थ्यांना नाटिकेच्या माध्यमातून गुड टच व बॅड टच या विषयी मार्गदर्शन केले.
शाळेचे प्राचार्य फा.सॅन्टो थॉमस यांनी देखील बाहेरच्या जगात वावरताना, सोशल मीडियाचा वापर करताना विद्यार्थ्यांनी व पालकांनी कोणत्या प्रकारे सावधानता बाळगावी या विषयावर मार्गदर्शन केले. सदर प्रसंगी शाळेचे प्राचार्य फा.सॅन्टो थॉमस, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद, व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत