साई आदर्श मल्टीस्टेटला सहकार गौरव पुरस्कार - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

साई आदर्श मल्टीस्टेटला सहकार गौरव पुरस्कार

राहुरी/वेबटीम:- येथील साई आदर्श मल्टिस्टेट  पतसंस्थेला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त झाला असून संस्थेचे संस्थापक चेअरमन शिवाजीराव कपाळे ...

राहुरी/वेबटीम:-


येथील साई आदर्श मल्टिस्टेट  पतसंस्थेला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त झाला असून संस्थेचे संस्थापक चेअरमन शिवाजीराव कपाळे यांनी हा पुरस्कार नुकताच स्वीकारला आहे. मल्टीस्टेट संस्थांना त्यांच्या कार्यास प्रोत्साहन मिळावे या हेतूने मल्टीस्टेट फेडरेशनच्या वतीने दरवर्षी पुरस्काराचे आयोजन करण्यात येते .यावर्षी या वर्षाच्या पुरस्कारासाठी साई आदर्श मल्टीस्टेट या संस्थेने सादर केलेल्या माहितीच्या आधारे हा पुरस्कार साई आदर्श  या संस्थेला मिळालेला आहे.


 समितीने केलेल्या मूल्यांकनुसार मल्टीस्टेट पतसंस्था विभागामध्ये या पुरस्कारासाठी 100 ते 200 कोटी ठेवी या गटात प्रथम क्रमांकासाठी या संस्थेची निवड करण्यात आली. 

केंद्रीय सहकार सचिव  आशिषकुमार भुतानी साहेब यांच्या हस्ते सदर पुरस्कार संस्थेचे संस्थापक चेअरमन शिवाजीराव कपाळे व सहकार्यांनी स्वीकारला आहे.

 याप्रसंगी मा.सहकार मंत्री सुभाष देशमुख, बुलढाणा अर्बनचे राधेश्याम चांडक, राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे, मल्टीस्टेट फेडरेशनचे अध्यक्ष सुरेश वाबळे ,जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी व्यासपीठावर उपस्थित होते.


साई आदर्श या संस्थेने संस्थेच्या स्थापनेपासून केवळ अर्थकारण नव्हे तर सामाजिक क्षेत्रामध्ये देखील आपला वेगळा ठसा निर्माण केल्यामुळे व इतरांना आदर्शवत काम केल्यामुळेच या संस्थेला पुरस्कार मिळालेला आहे. 

यावेळी कपाळे यांनी सांगितले की हा पुरस्कार म्हणजे आम्ही केलेल्या कामाची पावती आहे .संस्थेच्या प्रगती बरोबरच सभासद ठेवीदार कर्जदार यांचे हित जोपासण्याचे काम आम्ही गेले 11 वर्षापासून करत आहोत त्यासाठी आम्ही अहोरात्र झटून संस्था प्रगतीपथावर नेली आहे. त्यामुळे ठेवीदार, कर्जदार, सभासद यांचा विश्वास जपण्यामध्ये आम्ही यशस्वी ठरलेलो आहोत याचा आम्हाला सार्थ अभिमान अभिमान आहे यासाठी  संचालक मंडळ, कर्मचारी वृंद, कलेक्शन एजंट, सभासद ठेवीदार, खातेदार ,हितचिंतक यांचे मोठे सहकार्य लाभलेले आहे. त्यांनी संस्थेवर मोठा विश्वास नेहमी टाकलेला आहे त्यास आम्ही कधी तडा जाऊ देणार नाही. येत्या कालावधीमध्ये  200 कोटी ठेवींचा टप्पा  आम्ही नक्कीच पार करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

हा सन्मान स्वीकारताना संस्थेचे संचालक विष्णुपंत गीते, बाळासाहेब तांबे, किशोर थोरात मॅनेजर सचिन खडके, गोपीनाथ हारगुडे  आदी मान्यवर उपस्थित होते .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत