दीपक त्रिभुवन यांनी अजित पवारांपाठोपाठ मुख्यमंत्री शिंदे यांची घेतली भेट - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

दीपक त्रिभुवन यांनी अजित पवारांपाठोपाठ मुख्यमंत्री शिंदे यांची घेतली भेट

  मुंबई/वेबटीम:- आरक्षित असलेल्या श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेल्या राहुरी फॅक्टरी येथील शांती चौक मित्र म...

 मुंबई/वेबटीम:-



आरक्षित असलेल्या श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेल्या राहुरी फॅक्टरी येथील शांती चौक मित्र मंडळाचे अध्यक्ष दीपक त्रिभुवन यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांपाठोपाठ राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. यामुळे दीपक त्रिभुवन हे उमेदवारी करण्यासाठी आग्रही असून त्या दृष्टीने फिल्डिंग सुरूच ठेवली आहे.



 गेल्या महिन्यात दीपक त्रिभुवन यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट उमेदवारीची मागणी केली होती. त्यानंतर त्रिभुवन यांनी श्रीरामपूर मतदारसंघात संपर्क अभियान सुरू करून भेटीगाठीही सुरू ठेवल्या. त्रिभुवन यांच्या अभिष्टचिंतनाचे फ्लेक्स मतदारसंघात झळकले होते. आता निवडणूक काही दिवसात जाहीर होणार असल्याने इच्छुक उमेदवार आपापल्या पद्धतीने उमेदवारी साठी प्रयत्नशील असताना राहुरी फॅक्टरी येथील दीपक त्रिभुवन यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेऊन उमेदवारीबाबत इच्छा व्यक्त केली आहे. श्रीरामपूर मतदारसंघात शिंदे सेनेकडून उमेदवारीसाठी माजी खा.सदाशिव लोखंडे यांचे चिरंजीव प्रशांत लोखंडे, माजी आ.भाऊसाहेब कांबळे यांसह अनेक नेते प्रयत्नात असताना दीपक त्रिभुवन यांनी थेट मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.


यामध्ये श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघांमध्ये राहुरी फॅक्टरी येथील शांती चौक मित्र मंडळाचे अध्यक्ष दीपक त्रिभुवन विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. त्यांच्यासाह असंख्य कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन उमेदवारीची मागणी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत