देवळाली प्रवरा नगरपरिषदेकडून गणेश विसर्जनासाठी ४ फिरते संकलन रथ - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

देवळाली प्रवरा नगरपरिषदेकडून गणेश विसर्जनासाठी ४ फिरते संकलन रथ

  देवळाली प्रवरा(वेबटीम) देवळाली प्रवरा नगरपरिषदे मार्फत सालाबादप्रमाने माझी वसुंधरा अभियान ५.० अंतर्गत “पर्यावरण पूरक गणेशोत्सव” साजरा करणे...

 देवळाली प्रवरा(वेबटीम)



देवळाली प्रवरा नगरपरिषदे मार्फत सालाबादप्रमाने माझी वसुंधरा अभियान ५.० अंतर्गत “पर्यावरण पूरक गणेशोत्सव” साजरा करणेत  येणार आहे.त्याकरिता नगरपरिषदेच्यावतीने देवळाली प्रवरा गावठाण  व राहुरी कारखाना भागात  ४फिरते संकलन रथ तयार करून गणेश मूर्ती संकलन करणेत  येणार आहे .  तसेच शहरातील बाजारतळ देवळाली प्रवरा ,पेपर मिल रस्ता राहुरी कारखाना, समर्थ नगर राहुरी कारखाना  या ठिकाणी कृत्रिम संकलन  व विसर्जन केंद्र  तयार करणेत येणार आहे अशी माहिती आरोग्य विभाग प्रमुख कृष्णा  महांकाळ यांनी दिली आहे.


गणेश भक्तांनी निर्माल्य, गणेश मूर्ती इतर  ठिकाणी विसर्जन न करता  नगपरिषदेने उपलब्ध करून दिलेल्या फिरते संकलन केंद्र  विसर्जन केंद्र येथे गणेश मूर्ती व निर्माल्य कलशात निर्माल्य जमा  विसर्जित करावे असे आवाहन नगरपरिषदे मार्फत करण्यात आले आहे.


सर्व जमा केलेल्या  गणेश मूर्तीचे अमोनियम बायकार्बोनेटच्या सहायाने  न शास्त्रोक्त पद्धतीने विसर्जित करणेत येणार आहे. तसेच जमा केलेल्या निर्माल्याचे खत तयार करणार आहे .


तरी सर्व शहरवासियांनी सदर अभियानात सहभाग घ्यावा व नगपरिषदेस  सहकार्य करावे. असे आव्हान मुख्याधिकारी विकास नवाळे यांनी  केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत