श्रीरामपूर (प्रतिनिधी) महाराष्ट्रातील इतर जिल्ह्याच्या मानाने नगर जिल्हा सर्वात मोठा आहे. जिल्हा विभाजनाची गरज सर्वांनाच आहे. शासनाला आज ना ...
श्रीरामपूर (प्रतिनिधी)
महाराष्ट्रातील इतर जिल्ह्याच्या मानाने नगर जिल्हा सर्वात मोठा आहे. जिल्हा विभाजनाची गरज सर्वांनाच आहे. शासनाला आज ना उद्या जिल्हा विभाजन करावाच लागणार आहे. त्यासाठी श्रीरामपूर जिल्हा संघर्ष सामाजिक भावनेतून चालूच ठेवावा असा मौलीक सल्ला राजेंद्र लांडगे यांना माजी जिल्हा परिषद सदस्या आणि जिल्हा नियोजन समिती सदस्या राणीताई लंके यांनी दिला आहे.
निंबळक येथे सौ. राणीताई निलेश लंके यांच्या संकल्पनेतून आरोग्य यज्ञ 2024 अंतर्गत स्तन कर्करोग तपासणी व रक्तदान शिबिर प्रसंगी राणीताई लंके आल्या होत्या. याप्रसंगी राणीताई लंके यांची श्रीरामपूर जिल्हा संघर्ष समिती संस्थापक अध्यक्ष राजेंद्र लांडगे यांनी भेट घेऊन त्यांचा सत्कार केला. यावेळी ग्रामपंचायत सरपंच
प्रियंकाताई लामखडे उद्योजक अजय लामखडे उपसरपंच बाळासाहेब कोतकर केतन लामखडे बाबासाहेब लामखडे संजय जपकर घनश्याम म्हस्के बाळासाहेब पानसंबळ भाऊराव गायकवाड तोफीक पटेल शिवाजी होळकर संजय गेरंगे संदीप गेरंगे पोपट भागवत मेजर कौशल यादव मेजर एकनाथ अडसुरे मेजर ताराचंद पगारे मच्छिंद्र म्हस्के जयराम खेडेकर इत्यादी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी राजेंद्र लांडगे म्हणाले की, सलग अकरा वर्षापासूनचा श्रीरामपूर जिल्हा संघर्ष शेवटच्या क्षणापर्यंत चालूच ठेवणार आहे.शिवाय श्रीरामपूर जिल्हा नाहीतर मतदान नाही या अल्टिमेटमवर देखील ठाम असल्याचे सांगितले. श्रीरामपूर जिल्हा संघर्ष समितीच्या पुढील आंदोलनात आम्ही आवर्जून उपस्थित राहु अशी ग्वाही देताच लंके कुटुंबियांचे राजेंद्र लांडगे यांनी शेवटी शब्दरूपी आभार मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत