राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- राहुरी फॅक्टरी येथील सामाजिक, धार्मिक,सांस्कृतिक क्षेत्रात नेहमी अग्रेसर असलेल्या वैष्णवी चौक युवा प्रतिष्ठानच्या वत...
राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-
राहुरी फॅक्टरी येथील सामाजिक, धार्मिक,सांस्कृतिक क्षेत्रात नेहमी अग्रेसर असलेल्या वैष्णवी चौक युवा प्रतिष्ठानच्या वतीने यंदाही नवरात्र उत्सवानिमित्त दि.३ ते १२ ऑक्टोबर या कालावधीत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
वैष्णवी चौक युवा प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी मोठ्या उत्साहात नवरात्र उत्सव साजरा केला जातो. या निमित्ताने स्थानिक कलावंतांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे तसेच देवी भक्तांसाठी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले येते. यंदा या उत्सवाचे १९ वे वर्ष आहे.
३ ऑक्टोबर रोजी सत्यजित कदम, गणेश भांड, शिवाजीराव कपाळे व श्रीकांत चांडक यांच्या हस्ते घटस्थापना, ४ ऑक्टोबर रोजी आराध्यांचा मेळा, रात्री ९ वा.जादुगार प्रकाश शिरोळे प्रस्तुत तुफान कॉमेडी व जादूचे प्रयोग, ५ ऑक्टोबर रोजी उमेद सोशल फाउंडेशन सहकार्याने मोफत स्त्री रोग व वंधत्व निदान शिबिर तसेच याच दिवशी रात्री ९ वा.पुणे मुक्तांगण येथील व्यसनमुक्ती समुपदेशक राहुल जाधव यांचे व्यसनमुक्तीवर प्रेरणादायी व्याख्यान, ६ ऑक्टोबर रोजी रांगोळी स्पर्धा, संगीत खुर्ची व अंताक्षरी स्पर्धा, ७ ऑक्टोबर रोजी महिला,मुले व मुलींसाठी चित्रकला स्पर्धा व रात्री ९ वा. पुणे येथील युवा शाहीर चंद्रकांत व ऋतुजा माने प्रस्तुत शाहिरी पोवाड्यांचा कार्यक्रम, ८ ऑक्टोबर रोजी खुल्या दांडिया, ९ ऑक्टोबर रोजी स्थानिक कलाकारांना व्यासपीठ मिळावे या उद्देशाने सबसे बडा कलाकार हा नाट्यअविष्कार, १० ऑक्टोबर रोजी नृत्य स्पर्धा, ११ ऑक्टोबर रोजी शाहीर निजामभाई शेख यांचे कीर्तन व १२ ऑक्टोबर रोजी देवी विसर्जन मिरवणुकीने उत्साहाची सांगता होणार आहे. सांस्कृतिक कार्यक्रमास आ.लहू कानडे, माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम, उद्योजक विजयकुमार सेठी,ऋषभ लोढा, साई आदर्शचे चेअरमन शिवाजीराव कपाळे, धर्मवीर संभाजीराजे प्रतिष्ठान अध्यक्ष राजूभाऊ शेटे, सुरेश कणसे व सुधाकर आदिक तसेच समाजातील दानशूर मंडळी व देणगीदारांचे सहकार्य लाभणार आहे.
तरी या कार्यक्रमांसाठी परिसरातील भाविक व नागरिकांनी उपस्थित रहावे व स्पर्धेमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन वैष्णवी चौक युवा प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत