राहुरी(प्रतिनिधी) राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांच्यातर्फे आयोजिय शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती राज्यस्तरीय स्पर्धेत श्रीम.अ...
राहुरी(प्रतिनिधी)
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांच्यातर्फे आयोजिय शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती राज्यस्तरीय स्पर्धेत श्रीम.अंजुम शेख सय्यद यांना राज्यस्तरीय द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे.
त्यामध्ये इयत्ता तिसरी ते पाचवी या गटात भाषा विषयात श्रीम . शेख यांनी व्हिडिओ बनवला होता.या व्हिडिओची राज्यस्तरावर निवड होऊन त्यांना द्वितीय पुरस्कार मिळाला. सदर पुरस्कार वितरण समारंभ राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषदेच्या महात्मा फुले सभागृह, पुणे येथे शालेय शिक्षणमंत्री श्री. दिपक केसरकर ,शालेय शिक्षण व साक्षरता विभाग भारत सरकार नवी दिल्ली येथील केंद्रिय सहसचिव अर्चना अवस्थी, राज्याचे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या प्रधान सचिव आय. ए. कुंदन , शिक्षण आयुक्त सूरज मांढरे, म. प्राथ. शिक्षण परिषदेचे राज्य प्रकल्पसंचालक आर विमला, रा. शै. सं.व प्र.परिषदेचे संचालक राहुल रेखावार यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.पुरस्काराचे स्वरुप रोख रक्कम तसेच सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, सिल्व्हर मेडल असे आहे.
श्रीम. शेख अंजुम ह्या जि. प. प्राथ शाळा रांजण खोल,तालुका राहाता, जिल्हा अहमदनगर शाळेत कार्यरत असून त्यांच्या या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक वृंद व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य तसेच ग्रामस्थ यांच्या वतीने कौतुक कऱण्यात आले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत