कसं वाटतंय मग १० तोंडी राक्षसाचा वध करून??? माझे दहा तोंड आहे . ही भीती दाखवण्यासाठी सुमाली आजोबांनी सुचवलेली कल्पना होती. पण तुमच्यातील वे...
कसं वाटतंय मग १० तोंडी राक्षसाचा वध करून???
माझे दहा तोंड आहे . ही भीती दाखवण्यासाठी सुमाली आजोबांनी सुचवलेली कल्पना होती. पण तुमच्यातील वेगवेगळ्या प्रकारचे दहा तोंड मला दिसताय. त्याच काय?
संघर्ष हा तर माझ्या पाटीलाच पुंजलेला. आर्य कुळात ब्राह्मण म्हणून जन्माला आलो तरी मला माझ्या पित्याने नाकारलं.
माझं अस्तित्व संपल अस वाटू लागलं.
स्वतःला आर्य म्हणून घेणारो मी त्यादिवशी स्तब्ध झालो.
माझा जन्म फक्त शरीर वासना शांत करण्यासाठी झालेल्या संभोगातून झाला. ह्या भावनेने माझे आतून खच्चीकरण झाले.
कर्तृत्व घडण्याआधीच पराजित होऊन सर्वस्व गमावलं ...
कुबेराने लंका जिंकली आणि माझ्या आईला आणि मावश्याना त्याच्या बापाकडे पाठवले. किती नीचपणा केला त्याने, आणि म्हणायला तो माझा सावत्र भाऊ...
माझ्या आईवर मावशीवर बलात्कार केले आणि त्यांना आश्रमातील दासी सारखे वागवले.
माझ्या मनात पेटली ती प्रतिशोधाची आग!!!
असं जर तुमच्यासोबत झालं असतं तर तुम्ही काय गप बसले असते का???
कुबेराच्या सुनावर बलात्कार केला. तो बलात्कार मी माझ्या शरीर वासना म्हणून केला नाही तर आई आणि मावशीचा प्रतिशोध होता.
मला त्याच्या अश्रूचा काहीच फरक पडला नाही . खरं तर माझा प्रतिशोध त्याला मारण्याने होता पण त्याने आईला आणि मावशीला जीवनदान दिले होते त्यामुळे त्याला मी सोडले.
महादेवाचा मी सर्वश्रेष्ठ भक्त ठरलो.
सर्वांना समान मानणारे महादेव जवळचे वाटू लागले. मनातला आक्रोश कधीच कुणाला सांगायचं नसतो हे मी शिकलो
अहंकार हा अर्धवट ज्ञानाने तयार होतो. पण मी तर परिपूर्ण ज्ञानी
ज्या भटक्या विभक्त जाती आहे त्यांना स्थैर्य निर्माण करून देण्याचं मी ठरवलं आणि दिले पण.
मी दैत्य,मानव , असूर ,गंधर्व, नाग ह्या टोळ्यांना जमा करून राक्षस साम्राज्य तयार केले
सगळ्यांना समान वागवलं. आमच्यात फक्त देव आणि राक्षस ह्या दोन जाती होत्या. कधी मी कुणाला तुच्छ लेखलं नाही तरी आता तुच्छ लेखले जाते
पण आज बघतो तर प्रत्येकजण जातीसाठी लढतोय. समोरच्या धर्माला तुच्छ समजतोय.
रावणाच्या सम्राज्यापेक्षा हा समाज मला जास्त भयाण वाटतोय
जन्मावरून प्रतिष्ठा ठरवने मला चुकीचं वाटलं. कधी मी त्या विचारांचा गुलाम झालो नाही.
बुद्धिबळ, रुद्रविना, रावणसंहिता कुमारतंत्र, शिवतांडव स्तोत्र यातून मी ज्ञान दिलं.
दर्शन , आयुर्वेद, राज्यशास्त्र, व्यापार ह्या विषयात मी परिपूर्ण होतो. स्व-बळावरती मी सर्व देवांना हरवलं होतं.
दशग्रीव माझं नाव होतं पण महादेवाने मला नवीन नाव दिलं ते म्हणजे "रावण"
आयुष्य दीर्घ असून उपयोग नाही तर ते सुखी असावं...
महादेवाची पूजा करताना माझ्या पूजेत व्यत्यय आला तो सहस्अर्जूनामुळे. माझा रागावर ताबा नव्हता म्हणून मला सहस्रअर्जुनाने कैद केलं.काही काळ गेल्यानंतर कळलं की , एकांत आणि स्वतःची झालेला संवाद हा किती महत्त्वाचा असतो.
बाप जिवंत असतानाच मी त्याचे अंत्यसंस्कार केले ही माझी क्रूरता नाही तर त्याने माझ्यावरती केलेले आघात आहे.
तोंडावर थुकलं तर प्रसाद म्हणून खाणाऱ्या बेगडी वृत्तीच्या गुलाम झालेल्या जमातीला माझ्या संस्कृतीत मी प्रवेश नाही दिला.
"हुशार माणसं नम्रच असतात"
मी सगळ्या भावंडाची काळजी घेतली. त्यांची लग्न हे सुंदर कन्येसोबत लावून दिले.त्रौऱ्याक्यातील सर्व सुख मी त्यांच्या पायाशी टाकले तरी पण बिबीशन ने माझ्याशी गद्दारी केली.
आताच्या काळात मी बघतोय तर भाऊ भावांचे वैरी आहे. थोड्या लालसापायी ते त्यांची घृण हत्त्या करतात. त्यांना वाटेल ते बोलतात.
वेदवती कुशध्वज ऋषीची कन्या मला आवडली. तिला मी विवाहासाठी विचारल, पण तिने नकार दिला.म्हणून मी तिच्यावर जबरदस्ती बलात्कार केला. तिला सगळे सुख देयला मी तयार होतो. ऋषीकन्येचा उपभोग मी घेतला. प्रत्येक पुरुषांमध्ये बलात्कारी पुरुष लपलेला असतो तो फक्त एका संधीची वाट बघत असतो.
समागम हे पृथ्वीच्या उत्पत्तीच प्रतीक आहे. समागमाने नवीन जीव जन्माला येतो ते पाप कसं असणार आहे. ह्या विचाराचा मी होतो.
मी कधी लहान मुलीवरती किंवा सामुहिक बलात्कार केले नाही. पण आत्ताच्या काळात स्त्रीला पायातली चप्पल मानणारे पुरुष मी बघतोय. इथ लहान ,मोठे वृध्द कुणीही बघितलं जातं नाही.
माझ्या पेक्षा तर सर्वात जास्त पापी तुम्हीच ना???
इंद्राने किती अप्सरा सोबत बलात्कार केले. त्या सगळ्यांना आपण आपल्या भाषेत वैश्या असं बोलतो. मी केलं ते कसं चुकीचं मग?
बुद्धी, ज्ञान, शौर्य, सामर्थ्य या सर्व गुणांनी संपन्न राजा मी...
माझ्या मुलाची जन्माची दिशा बदलून त्याला मारण्याचे षडयंत्र करणाऱ्या शनीला मी कैद केले.
कालकेय विद्दूजिव्हान त्याच्या मातेची हत्या केली. तो माझा बहिणीचा नवरा असतानाही त्याला सोडलं नाही. त्याला मृत्युदंड दिला. राक्षस साम्राज्यात मातृहत्या सर्वात मोठे पाप आहे.
आजच्या काळात आईला वाटेल तो बोलणार तरुण मला दिसतोय, आईला घरातून काढून देणारा दिसतोय.
मी रावण का तुम्ही रावण???
मला कायमच ज्ञानाची भूक होती, ज्ञानाची भूक कधीच मानसिक स्थैर्य देत नाही.
आजोबाच्या प्रतिशोधासाठी मी इंद्रासोबत लढलो. माझ्या मुलाने इंद्राला कैद केले.
खर, दूषण याची हत्या केली आणि माझ्या बहिणीचे कान आणि नाक कापलं. मी कस काय गप बसणार?
शूर्पणखाचा विनयभंग हा तिच्या प्रेमभावनेची हत्या होती.तिला विद्रूप बनवणाऱ्या लोकांना कसं मी सोडणार?
त्यातूनच नवीन प्रतिशोधची भावना निर्माण झाली.
शूर्पणखाचे लग्न राम किंवा लक्ष्मण यांच्या दोघांपैकी एका सोबत लावायचं आहे , यात काय चुकीचा होतो मी...?
तुमच्यासारखे तर नाही बहिणीने भावाच्या संपत्तीत हिस्सा घेतला तर तिच्याशी पूर्ण संबंध तोडून टाकायचे. तिला वाटेल ते बोलायचं.
आहो मला पापी म्हणण्यापेक्षा स्वतःकडे बघा.
दोन आर्यांनी १४००० सैनिक मारले. प्रतिशोध आमच्या रक्तातच. त्याच प्रतिशोधामध्ये मी सर्वस्य गमावलं.
सीतेच अपहरण केलं पण तिच्यावर कोणत्याही पुरुषाची नजर पडणार नाही म्हणून मी तिला अशोकवनात ठेवलं.
मी हे विसरून गेलो की, तिच्या चारित्र्यावर खूप मोठा डाग लागला जाईन. तिला हा समाज मान्य करणार नाही. त्याचा मला पश्चाताप झाला.
माझ्या लंकेत सैनिकाचे घर सुद्धा सोन्याचे होते. रस्ते,गोशाळा आश्रम बनवले. सर्व संपन्न लंका मी बनवली.
मी माझ्या राज्याचा आणि राज्यातील नागरिकांचा एवढा विचार केला आणि त्यांना सर्व सुख प्रदान केले तर मी पापी कस काय झालो?
मी केलेल्या व दुसऱ्यांकडून झालेले स्त्रीवरती अत्याचार ह्याचा मला पश्चाताप झाला.
माझ्या भावाने व लक्ष्मणाने माझ्या मुलाचा अनऔपचारिकपणे घात केला.
माझी सून ही सती गेली. तिला मी ओरडून सांगितलं दुःखावरती काळ हे औषध असत!!!
माझ्या आधी माझ्या मुलांचे मृत्यू मला बघावे लागले. हे सगळ्यात मोठ दुःख माझ्यासाठी होत.
माझं सर्वस्व प्रतिशोधात गेलं.
एका वडिलांना सगळ्यात जास्त दुःख तेव्हा होते जेव्हा त्याचा मुलगा त्याच्या आधी हे जग सोडून जातो.
कपट्याने माझ्या मेघनंदाची हत्या केली. मंदोदरीने तिचे दोन पुत्र गमावले. आईच ह्रदय होत ते , तिला कस वाटल असेल... जिवंतपणे ती मृत्य भोगत होती.
मला युद्धात हरवलं गेलं माझा शेवट जवळ आला.
लक्ष्मण माझ्या जवळ आला आणि मला म्हणाला मला तुमचं शिष्य व्हायचं आहे. मला हसावं की रडाव काही कळेना झालं.
ज्या कपट्याने याने माझ्या मुलाला मारून टाकलं आता तो ज्ञानग्रहणाच्या अपेक्षा करतोय... महादेवा काय आहे रे हे....
तुम्ही ज्ञानी पंडित आहात तुम्हाला ब्रह्मज्ञान प्राप्त आहे हे मला माझे बंधू रामांनी सांगितलं. मला तुमचा शिष्य बनवा.
त्याच्या तोंडातून शब्द निघाले लंकापती रावण तुम्ही महान आहे. तुमच्या सारखा ज्ञानी त्रौलोक्यात्त नाही.
" संघर्ष न करता जगला तर भौतिक सुख मिळेल पण आत्मिक समाधान कधीच मिळणार नाही "
राजा सारखा एकट्यानं कधीही सुख उपभोगलं नाही तर सगळ्यांना एकत्रित करून त्यांनाही सुख दिलंय.
आजपर्यंत सर्वच लोकांनी मला हिणवलं आहे. माझी ओळख फक्त दृष्ट राक्षस म्हणून झाली आहे.मला अनुभवायचं असेल तर मी होऊन बघा..
मला न जाणता माझी प्रतिमा जाळणाऱ्या अज्ञानी लोकांची मला कीव येते.
हजार वर्षापासून तुम्ही मला जाळत आहे तरी पण मी संपलो नाही....
*लेखिका*
मनिषा रंजना बाळासाहेब लांबे ✍🏻...राहुरी , अहमदनगर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत