राहुरी(चैताली हारदे) आझाद मैदान मुंबई येथे उमेद महिला श्री शक्तीचा एकच ध्यास शाश्वत ग्रामविकासउमेद अभियानास ग्रामविकास व पंचायत राज विभाग...
राहुरी(चैताली हारदे)
आझाद मैदान मुंबई येथे उमेद महिला श्री शक्तीचा एकच ध्यास शाश्वत ग्रामविकासउमेद अभियानास ग्रामविकास व पंचायत राज विभागातील शासनाचा एक नियमित विभाग म्हणून आस्थापने ला मान्यता द्यावी व त्या अंतर्गत कार्यरत कंत्राटी अधिकारी व कर्मचारी यांना समुदाय संसाधन व्यक्ती ज्यांना शासनाच्या समकक्ष पदावर कायमस्वरूपी सेवेत समाविष्ट करून घेणे.
प्रभाग संघ स्तरावरील कृषी व्यवस्थापक ,पशू व्यवस्थापक प्रभाग संघ व्यवस्थापक सीटीसी यांचे उमेद केडर मध्ये न मानधन वाढवण्याबाबत. मागण्यासाठी ऊन पाऊस वारा सहन करीत मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी आझाद मैदानात उमेद केडरच्या महिलांचे हाल चालू आहेत१४ तारखेला रात्री ही पोलिसांना पुढे करून महिलांना दडपशाही करण्याचा प्रयत्न केला. केस करून जेलमध्ये टाकण्याची धमक्या देण्यात आल्या. रात्री रेल्वे स्टेशनला , बस स्टँडला महिला थांबलेले असताना त्यांना तिथेही दडपशाही पोलिसांकडून करण्यात आली ,बाळाचा वापर करण्यात आला महिलांनी रात्र ही जागून काढली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत