छत्रपती प्रतिष्ठान विधानसभेला उमेदवार देणार; श्रीरामपूर, राहुरीसह 'या' मतदार संघात चाचपणी - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

छत्रपती प्रतिष्ठान विधानसभेला उमेदवार देणार; श्रीरामपूर, राहुरीसह 'या' मतदार संघात चाचपणी

  अहमदनगर(वेबटीम):- शेतकर्‍यांची कर्जमाफी, मराठा आरक्षणाचा विषय, वाढती बेरोजगारी, शेतमालाला हमीभाव, पाटपाण्याचे नियोजन इत्यादी स्थिती बदलविण...

 अहमदनगर(वेबटीम):-


शेतकर्‍यांची कर्जमाफी, मराठा आरक्षणाचा विषय, वाढती बेरोजगारी, शेतमालाला हमीभाव, पाटपाण्याचे नियोजन इत्यादी स्थिती बदलविण्यासाठी येणार्‍या विधानसभा निवडणुकीत छत्रपती प्रतिष्ठाणनेही काही मतदार संघात उमेदवार देण्याचा निर्णय घेतला आहे. नगर येथील कालच्या बैठकीत श्रीरामपूर, नेवासा, राहुरी आणि नगर शहर या चार मतदार संघामधील इच्छुकांसंदर्भात चर्चा करण्यात आली.

    छत्रपती शिवरायांचे विचार तळागाळापर्यंत्त पोहचविण्याचा वसा घेतलेल्या छत्रपती प्रतिष्ठाणने विधानसभा निवडणुकीत काही मतदार संघात उमेदवार देण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात नगर येथे काल मंगळवारी दुपारी 3 वाजता बैठक पार पडली. प्रतिष्ठाणचे अध्यक्ष लक्ष्मण पटारे, कार्याध्यक्ष दीपक पंडीत, जयदीप ससाणे, राजाराम कुंभकर्ण, राजेंद्र मुसमाडे, प्रमोद भोसले, श्रीरंग पाचपुते, सदाभाऊ गागरे आदी यावेळी उपस्थित होते. या बैठकीत श्रीरामपूर विधानसभा मतदार संघ आरक्षित असून, येथून इच्छूक असलेल्या चार नावांवर यावेळी चर्चा झाली. 32 गावांतून उमेदवारी देण्यावरही साधक बाधक चर्चा झाली. तर राहुरीतून तीन नावे चर्चेत असून, या ठिकाणीही उमेदवार देऊन त्याला ताकद देण्याचा निर्णय घेण्यात आला. याशिवाय नगर शहर, नेवासा या दोन मतदार संघातही उमेदवार देण्यासाठी चाचपणी सुरू असल्याचे समजले.

  लवकरच पत्रकार परिषद घेऊन या संदर्भात निर्णय घेतला जाईल, असे दीपक पंडीत यांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत