राहुरी(वेबटीम) महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य असणारे गणेश शिंदे यांची राज्याच्या कृषी परिषदेवरती संचालक म्हणून न...
राहुरी(वेबटीम)
महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य असणारे गणेश शिंदे यांची राज्याच्या कृषी परिषदेवरती संचालक म्हणून निवड झाल्याबद्दल प्रेरणा उद्योग समूहाच्यावतीने संस्थापक चेअरमन सुरेश वाबळे यांनी त्यांचा सन्मान केला.यावेळी प्रशांत वाबळे उपस्थित होते.
गणेश शिंदे हे नगर तालुक्यातील पारगाव भातोडी गावचे मूळ रहिवासी असून. त्यांच्या नेतृत्वाखाली पारगाव भातोडी आदर्श गावाकडे वाटचाल करत आहेत. महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कार्यकारी परिषद सदस्य म्हणून कार्य करत असताना. विद्यापीठाचे तंत्रज्ञान नवीन पणन प्रणाली शेतकऱ्यांपर्यंत पोहोचाव्यात यासाठी ते कायम प्रयत्नशील असतात. शेतकऱ्यांचे मनोबल उंच व्हावे त्यांच्या घामाला व कष्टाला प्रतिष्ठा मिळावी यासाठी गणेश शिंदे यांनी आजवर अनेक व्याख्याने दिली आहेत.
राज्याच्या कृषी परिषदेवरती कार्य करत असताना सर्व कृषी विद्यापीठांच्या ध्येय धोरणावर कार्य करण्याची संधी गणेश शिंदे यांना मिळाली आहे.
गणेश शिंदे यांच्या निवडीमुळे निश्चित जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळणार असल्याचे प्रेरणा उद्योग समूहाचे अध्यक्ष सुरेश वाबळे यांनी म्हंटले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत