राहुरी/वेबटीम:- ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर राहुरी फॅक्टरी येथे भुरट्या चोरांचा सुळसुळाट सुरू झाला असून मध्यरात्री राहुरी फॅक्टरी स्टॅन्ड परिस...
राहुरी/वेबटीम:-
ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर राहुरी फॅक्टरी येथे भुरट्या चोरांचा सुळसुळाट सुरू झाला असून मध्यरात्री राहुरी फॅक्टरी स्टॅन्ड परिसरातील ४ दुकाने फोडून चोरट्यांनी किरकोळ मुद्देमाल लंपास केला आहे.
विकी साळुंके यांचे पान स्टॉल, भारत गीते व मुकेश खपके यांचा वडापाव स्टॉल व विजय चौधरी यांची चहाचे दुकान फोडून किरकोळ रक्कम व मुद्देमाल लंपास केला.आज सकाळी या घटना उघडकीस आल्या आहेत.
दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर भुरट्या चोरांनी ही चोरी केल्याने व्यापारी वर्गातून भीती व्यक्त होत आहे.
पोलीस प्रशासन निवडणूक कामात दंग असल्याने चोरी व इतर घटनांमध्ये वाढ होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत