गुहाच्या मनीषा लांबे लिखित 'सत्यांश' पुस्तकाचे प्रकाशन - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

गुहाच्या मनीषा लांबे लिखित 'सत्यांश' पुस्तकाचे प्रकाशन

राहुरी(वेबटीम) राहुरी तालुक्यातील गुहा गावच्या कन्या मनिषा रंजना बाळासाहेब लांबे लिखित राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांवर आधारित ...

राहुरी(वेबटीम)



राहुरी तालुक्यातील गुहा गावच्या कन्या मनिषा रंजना बाळासाहेब लांबे लिखित राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांवर आधारित 'तरुणांच्या पाऊल  खुणा अर्थात सत्यांश' या पुरस्काचे प्रकाशन संपन्न झाले.

अमरावती जिल्ह्यातील मोझरी येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या समाधीस्थळी प्रकाशन सोहळा संपन्न झाला.


परमहंस शंकर महाराज , गुलाब महाराज, डॉ.राजेंद्र बोधे, कृषी अधिक्षक भाऊसाहेब बऱ्हाटे, सुधाकर होले, जयकृष्ण धर्माले, काशिनाथ गवणे , प्रदीप येसणे आदी उपस्थित होते.



या पुस्तकात राष्ट्रसंतांच्या विचारसरणीच्या आधारे तरुणाईला मार्गदर्शन करणारे विचार आणि तत्त्वज्ञान उलगडले आहे. या पुस्तकात महाराजांच्या तत्त्वज्ञानातून तरुण पिढीला जीवनाचे मार्गदर्शन आणि समाजसेवा याबाबत प्रेरणा देणारी अनेक उदाहरणे दिली असून आजच्या तरुणांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.यातून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचार कसे योग्य दिशेने मार्गदर्शन मिळू शकते यावर विशेष भर देण्यात आलेला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत