राहुरी फॅक्टरी येथील शांती चौक मित्र मंडळाच्या वतीने आज शुक्रवारी वैष्णवी मातेच्या गडाच्या देखाव्याचे उद्घाटन उद्योजक विजयकुमार सेठी यांची उपस्थिती - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरी फॅक्टरी येथील शांती चौक मित्र मंडळाच्या वतीने आज शुक्रवारी वैष्णवी मातेच्या गडाच्या देखाव्याचे उद्घाटन उद्योजक विजयकुमार सेठी यांची उपस्थिती

राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- राहुरी फॅक्टरी येथील शांती चौक मित्र मंडळाच्या वतीने दरवर्षी प्रमाणे नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत...

राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-

राहुरी फॅक्टरी येथील शांती चौक मित्र मंडळाच्या वतीने दरवर्षी प्रमाणे नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो यावर्षी अर्थात ३२ व्या वर्षी शांती चौक मित्र मंडळाच्या वतीने नवरात्र उत्सव काळात विविध सामाजिक,सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.


काल ३ ऑक्टोबर रोजी स.१० वाजता वैष्णवी मातेच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व घटस्थापना करण्यात आली.त्याच बरोबर भगवती मातेच्या ज्योतीचे स्वागत करण्यात आले.

तर आज शुक्रवार दि.४ ऑक्टोबर रोजी सायं.७ वाजता वैष्णवी मातेच्या गडाच्या देखाव्याचे उद्घाटन पुणे स्थित उद्योजक विजयकुमार सेठी यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. तर शनिवार दि.५ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजता नृत्य स्पर्धा (मोठा गट) आयोजित करण्यात आली आहे. रविवार दि.६ ऑक्टोबर रोजी सायं.५ वाजता श्री दुर्गा सप्तशती पाठ वाचन व त्याचबरोबर सायं. ९ वाजता नृत्य स्पर्धा (लहान गट) आयोजित करण्यात आले आहे.

तर सोमवार दि. ७ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजता होम मिनिस्टर खेळ पैठणीचा सादरकर्ते अनिल येवले सर व शिवव्याख्याते अभिजीत आहेर यांच्या उपस्थितीत होम मिनिस्टर कार्यक्रम संपन्न होणार आहेत.

तर मंगळवार दि. ८ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजता खाद्य स्पर्धा (पाककला) ही स्पर्धा पार पाडणार आहे.तर मंगळवार दि. ९ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजता भव्य खुल्या दांडिया  स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार दि. १० ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजता भव्य खुल्या दांडिया स्पर्धा तर गुरुवार दिनांक ११ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजता होमहवन श्री.पंकज तानावडे गुरू यांच्या पौरोहित्याने संपन्न होणार आहे.शुक्रवार दिनांक १२ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता मूर्तीचे विसर्जन संपन्न होणार आहे.

तरी नवरात्र उत्सव काळातील सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन शांती चौक मित्र मंडळाचे अध्यक्ष दीपक त्रिभुवन यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत