चिंचविहिरे येथील हर हर महादेव ग्रुप व राजूभाऊ शेटे मित्रमंडळाच्या वतीने नवरात्रोत्सव काळात विविध कार्यक्रमांचे आयोजन - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

चिंचविहिरे येथील हर हर महादेव ग्रुप व राजूभाऊ शेटे मित्रमंडळाच्या वतीने नवरात्रोत्सव काळात विविध कार्यक्रमांचे आयोजन

राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- राहुरी तालुक्यातील चिंचविहिरे येथील हर हर महादेव ग्रुप व राजूभाऊ शेटे मित्र मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्ष...

राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-

राहुरी तालुक्यातील चिंचविहिरे येथील हर हर महादेव ग्रुप व राजूभाऊ शेटे मित्र मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असून यावर्षी विविध कार्यक्रमांचे आयोजन या ग्रुपच्या वतीने करण्यात आले आहे.

काल सकाळी मांढरादेवी येथून आणलेल्या ज्योतीचे भव्य मिरवणूक काढून त्यानंतर घटस्थापना करण्यात आली.तर आज शुक्रवार दिनांक ४ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.तर शनिवार दिनांक ५ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजता ह.भ.प पूजा ताई महाराज गीते यांचे जाहीर हरिकीर्तन होणार आहे. रविवार दिनांक ६ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजता ह.भ.प कविराज महाराज झावरे यांचे जाहीर हरिकीर्तन होणार आहे.तर सोमवार दिनांक ७ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजता जागरण गोंधळाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे.तर मंगळवार ८ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजता ह.भ.प रोहिणी ताई जिरेकर यांचे कीर्तन संपन्न होणार आहे.बुधवार दिनांक ९ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजता जागरण गोंधळ कार्यक्रम तर गुरुवार दिनांक १० ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजता भव्य डान्स स्पर्धा आयोजन करण्यात आले आहे.शुक्रवार दिनांक ११ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजता महाआरती व होमवन आयोजित केला आहे. तर शनिवार दिनांक १२ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजता सकाळची आरती संपन्न होणार आहे.

तरी या नवरात्र चौकात भाविकांनी या ठिकाणी उपस्थित राहावे असे आवाहन हर हर महादेव ग्रुप व राजूभाऊ शेटे मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत