राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- राहुरी फॅक्टरी येथे उद्या रविवार दि.६ऑक्टोबर रोजी सायं. ६ वा.आ. लहू कानडे मित्र मंडळ यांच्या वतीने खास महिलांसाठी थर...
राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-
राहुरी फॅक्टरी येथे उद्या रविवार दि.६ऑक्टोबर रोजी सायं. ६ वा.आ. लहू कानडे मित्र मंडळ यांच्या वतीने खास महिलांसाठी थर्ड लेवल इंटरटेनमेंट निर्मित रंग जल्लोष मनोरंजनाचा विशेष उपक्रम नवदुर्गा सन्मान सोहळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या सोहळ्यात महाराष्ट्रातील नामवंत निवेदक स्वप्निल रास्ते, सेलिब्रिटी श्वेता खरात,श्वेता परदेशी, सारेगमप फेम अजित विसपुते,गायक भाग्यश्री डुंबरे व सुजित सोमण यांच्यासह अनेक नामवंत कलाकार या ठिकाणी उपस्थित राहणार असून आपली कला सादर करणार आहे.
रविवार दि. ६ ऑक्टोबर रोजी सायं. ६ वाजता राहुरी फॅक्टरी येथील दत्त लॉन्स येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असून या कार्यक्रमास परिसरातील माता भगिनी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन आमदार लहू कानडे मित्रमंडळाच्या वतीने अध्यक्ष अजय खिलारी यांच्यावतीने करण्यात आले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत