राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- वारकरी संप्रदायाचे भुषण,अध्यात्मिक क्षेत्रातीलमार्गदर्शक महंत उध्दव महाराज मंडलिक यांना एमआयटी विश्र्वशांती विद्यापी...
राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-
वारकरी संप्रदायाचे भुषण,अध्यात्मिक क्षेत्रातीलमार्गदर्शक महंत उध्दव महाराज मंडलिक यांना एमआयटी विश्र्वशांती विद्यापीठ पुणे आणि श्रीक्षेत्र आळंदी देहू विकास समिती यांच्या वतीने जागतिक स्तरावरील "समर्पित जीवनगौरव" पुरस्कार मिळाल्याबद्दल राहुरी फॅक्टरी येथील आदर्श नागरी पतसंस्थेच्या वतीने नेवासा येथे सन्मान करण्यात आला.
आदर्श नागरी पतसंस्थेचे जेष्ठ मार्गदर्शक संचालक आण्णासाहेब चोथे, चेअरमन सुधाकर कदम, व्हा.चेअरमन आबासाहेब वाळुंज व योगगुरु किशोर थोरात यांनी सन्मान केला.
याप्रसंगी चेअरमन सुधाकर कदमझ यावेळी बोलताना म्हणाले की ,विज्ञान व तंत्रज्ञान व अध्यात्म याची सांगड घालून अतिशय उंच भरारी घेणारी पुणे येथील एमआयटी संस्थेकडून या पुरस्काराने महाराजांना मिळणे हा त्यांच्या सामाजिक व अध्यात्मिक क्षेत्रातील कार्याचा गौरव आहे. यामुळे राहुरी फॅक्टरी परिसरात सर्वांना आनंद झाला आहे आदर्श पतसंस्थेला यापुढेही महाराजांचे आशिर्वाद व मार्गदर्शन मिळत राहील अशी अपेक्षा व्यक्त केली.याप्रसंगी नेवासा, शेवगाव ,वैजापूर ,गंगापूर, राहुरी श्रीरामपूर विविध भागातील भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत