श्रीरामपूर(वेबटीम) श्रीरामपूर कष्टकरी गरीब शेतकरी कुटुंबातून आलेल्या माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याने प्रशासकीय सेवेच्या माध्यमातून जनते...
श्रीरामपूर(वेबटीम)
श्रीरामपूर कष्टकरी गरीब शेतकरी कुटुंबातून आलेल्या माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याने प्रशासकीय सेवेच्या माध्यमातून जनतेची कामे केली मायबाप जनतेने मला लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिले राजकारण हा माझा धंदा नाही परंतु गरीब कष्टकरी शेतकरी शेतमजुरांचे प्रश्न जाणून असल्याने ते सोडवण्याचा आपला प्रयत्न असल्याचे प्रतिपादन आमदार लहू कानडे यांनी केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्ष व महायुतीच्यावतीने श्रीरामपूर विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी उत्सव मंगल कार्यालयात झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात आमदार कानडे बोलत होते राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश आदिक मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी होते यावेळी अमृत धुमाळ, अरुण पाटील नाईक, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष कैलास बोर्डे ,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस फारुख पटेल, ॲड रावसाहेब करपे , श्री.साठे,अशोक कारखान्याचे संचालक लाल पटेल, राहुरी बाजार समितीचे माजी सभापती वेणूनाथ कोतकर आदींसह मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते .
आमदार कानडे म्हणाले की, काँग्रेस पक्ष आपली उमेदवारी नाकारेल असे कोणालाही वाटत नव्हते विधान मंडळाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी आपल्या उमेदवारासाठी प्रयत्न केले मात्र काही चांडाळ चौकडीने तसेच ज्यांची दुकाने बंद झाली त्यांनी खोटेनाटे पसरवण्याचे काम केले. त्यामुळे आपली उमेदवारी कापली गेली असे असले तरी कोण किती लायकीचे आहेत ते आपण पुढील काळात बोलू पुराव्यानिशी सांगू उमेदवारी नाकारल्याने आपण उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्याशी संपर्क केला त्यांनी दिल्लीशी चर्चा करून उमेदवारी देण्याचे आश्वासन दिले दिलेल्या शब्दाप्रमाणे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आपली उमेदवारी जाहीर केली.
जनतेने आपल्यावरची जबाबदारी दिली त्या माध्यमातून मतदार संघात विकास कामे केली त्या कामाचा लेखाजोखा मानला पाहिजे हेतूने केलेल्या कामाचा कार्य अहवाल घराघरापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला. पाच वर्षातील पहिली दोन वर्षे कोरोनात गेली कोरोना नंतर महाआघाडीची सत्ता गेली तरी देखील मतदार संघात अकराशे ते बाराशे कोटी रुपयांची विकास कामे केली त्यासाठी अजित पवार यांचे सहकार्य लाभले विकास कामांचे फलक लावून विकास कामांमध्ये पारदर्शकता आणल्याचे आमदार कानडे म्हणाले .
अविनाश आदिक म्हणाले आमदार कानडे समर्थ व सक्षम नेतृत्व आहे. ते शब्दाचे पक्के आहेत कानडे यांनी बरोबर यावे अशी आपली अनेक वर्षापासूनची इच्छा होती ती आता पूर्ण झाली स्व. गोविंदराव आदिक यांनी तालुक्यात विकासाची गंगा आणली त्याच पद्धतीने आमदार कानडे यांनी मतदारसंघात काम केले परंतु त्यांच्या कामाचे चिज झाले नाही. सर्वेक्षणांमध्ये आमदार कानडे पहिल्या क्रमांकावर असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख अजित पवार यांनी कानडे यांना पसंती दिली आता ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व महायुतीचे उमेदवार असून राष्ट्रवादीचे आमदार म्हणून विधानसभेत जाणार आहेत असा विश्वास त्यांनी व्यक्त केला . अनेक वर्ष गमती जमती करणारे आज दिसत नसल्याने माझ्यासोबतच तुमच्याही चेहऱ्यावर समाधान दिसत असल्याचे ते म्हणाले .
आमदार कानडे यांनी नगरपालिकेत माजी नगराध्यक्ष अनुराधा आदिक यांना सहकार्य केले शहरात मोठ्या प्रमाणात विकास कामे केली जातीभेद गट तट याचा विचार न करता सर्वांना बरोबर घेऊन काम केल्याचे माजी नगरसेवक राजेंद्र पवार यावेळी म्हणाले.
विष्णुपंत खंडागळे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले बाबासाहेब कोळसे यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले
यावेळी माजी नगरसेवक राजेंद्र पवार सलीम शेख मल्लू शिंदे अशोक कारखान्याचे माजी संचालक लाल पटेल, बाळासाहेब मुंगसे प्रा कार्लस साठे ॲड रावसाहेब करपे उद्योजक अंकुश कानडे माजी नगरसेवक अशोक नाना कानडे, सतीश बोर्डे वळदगावचे सरपंच अशोक भोसले सचिन जगताप, मुठेवाडगावचे सरपंच सागर मुठे ,राजेंद्र कोकणे ,विष्णुपंत खंडागळे युनुस पटेल विजय शेलार ॲड समिन बागवान रज्जाक पठाण आदिवासी भिल्ल संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी गांगुर्डे ,अजय खिलारी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव फारुख पटेल सरपंच किशोर बकाल, हंसराज आदिक सुनील थोरात, आदित्य अदिक, साजिद मिर्झा, बाळासाहेब उंडे, संदीप चोरगे, श्रीकांत दळे, अविनाश नागरे, सुधाकर बोंबले, राहुल बोंबले, भागचंद औताडे, राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती वेनुनाथ कोतकर अक्षय नाईक मुदस्सर शेख बाबासाहेब कोळसे सुरेश पवार राजेंद्र औताडे आबा पवार मदन हाडके रमेश आव्हाड अमोल आदीक ज्ञानदेव आदीक दीपक कदम अजिंक्य उंडे इमरान शेख भैय्या शहा सागर कुऱ्हाडे बाबासाहेब ढोकचौळे अण्णासाहेब गवारे सुदाम पटारे, प्रताप पटारे रवींद्र मुरकुटे संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष शिवाजी पवार पी एस निकम रवी अण्णा गायकवाड सचिन ब्राह्मणे संदीप दांगट तुकाराम चींधें राधाकृष्ण तांबे डॉ. सर्जेराव सोळुंके अनिल बिडे नानासाहेब बडाख विष्णुपंत बडाख विजय दवंगे जमीर पिंजारी कदिर पटेल हरिश्चंद्र साळुंके रवी राजुळे सचिन कोळसे दिलीप तुपे दत्तात्रय जाधव जुगल गोसावी कोंडीराम विटनोर सुभेदार सय्यद गोरक्षनाथ नान्नोर सरपंच ॲड पूजा लावरे रुबीना पठाण रमा धीवर आदींसह मतदार संघातील कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत