श्रीरामपूर(सागर भालेराव) श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ निवडणुकीसाठी परिवर्तन महाशक्ती स्वाभिमानी शेतकरी संघटना व जिजाऊ संघटनेकडून राहुरी फॅक...
श्रीरामपूर(सागर भालेराव)
श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ निवडणुकीसाठी परिवर्तन महाशक्ती स्वाभिमानी शेतकरी संघटना व जिजाऊ संघटनेकडून राहुरी फॅक्टरीतील शांती चौक मित्र मंडळाचे अध्यक्ष दीपक त्रिभुवन यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे।
परिवर्तन महाशक्तीकडून गेल्या दोन दिवसापूर्वी दीपक त्रिभुवन यांना उमेदवारी जाहीर करण्यात येऊन देण्यात आली होती.
त्यानुसार सकाळी राहुरी फॅक्टरी येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे अभिवादन करून श्रीरामपूर येथे पोहोचल्यानंतर ढोल ताशाच्या गजरात पायी रॅली काढून प्रांत कार्यालय येथे दीपक त्रिभुवन यांनी आपला उमेदवारी अर्ज सादर केला.
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवी मोरे, साई आदर्श मल्टीस्टेटचे चेअरमन शिवाजीराव कपाळे, राहुरी निधी संस्थेचे चेअरमन रामभाऊ काळे आदींसह स्वाभिमानी शेतकरी संघटना व इतर संघटनेचे कार्यकर्ते तसेच शांती चौक मित्र मंडळाची सदस्य उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत