श्रीरामपूर(वेबटीम) श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ निवडणूकिसाठी देवळाली प्रवरा नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष तथा उद्योजक प्रकाश संसारे यांनी...
श्रीरामपूर(वेबटीम)
श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ निवडणूकिसाठी देवळाली प्रवरा नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष तथा उद्योजक प्रकाश संसारे यांनी आज अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे यावेळी भाजपचे नेते तथा माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम देखील उपस्थित होते.
श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात महायुतीमध्ये बंडाळी पहावयास मिळाली असून लहू कानडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा एबी फॉर्म तर भाऊसाहेब कांबळे यांच्याकडे शिवसेना शिंदे गटाचा ए बी फॉर्म जोडून उमेदवारी अर्ज दाखल केला.
भाजपाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार चंद्रशेखर कदम व माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम यांचे निकटवर्तीय असलेले माजी उपनगराध्यक्ष प्रकाश संसारे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यामुळे महायुतीतील बंडाळी वाढत असल्याचे दिसून येत असून प्रकाश संसारे यांनी आज दुपारी दोन वाजता आपला अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
दरम्यान सकाळी सत्यजित कदम यांनी माध्यमांशी बोलताना कानडे व कांबळे यांच्यात जर मैत्रीपूर्ण लढत होत असेल तर भाजपाने का थांबायचं म्हणून आम्ही प्रकाश संसारे यांचा अर्ज दाखल करत असून पक्षाच्या वरिष्ठांशी बोलून पाठिंब्या संदर्भात बोलणार असल्याचेही कदम यांनी सुतोवाच केले होते. त्यानुसार कदम यांच्याच उपस्थितीत प्रकाश संसारे यांचा अर्ज दाखल करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
यावेळी सचिन ढुस, अजित चव्हाण, सुधीर टिक्कल, संतोष चव्हाण, शहाजी कदम,सचिन शेटे, सतीश वने, सचिन सरोदे, मंगेश ढुस, ओंकार लांडे आदी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत