वाणी स्कुलच्या प्राचार्या सोनिया अंथोनी यांना भारत भूषण पुरस्कार - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

वाणी स्कुलच्या प्राचार्या सोनिया अंथोनी यांना भारत भूषण पुरस्कार

  राहुरी/वेबटीम:- राहुरी तालुक्यातील गणेगाव येथील  प्रसाद ग्रामीण शिक्षण संस्था संचलित ,श्री . बाळासाहेब वाणी सेंट्रल स्कूल अँड ज्युनिअर कॉल...

 राहुरी/वेबटीम:-


राहुरी तालुक्यातील गणेगाव येथील  प्रसाद ग्रामीण शिक्षण संस्था संचलित ,श्री . बाळासाहेब वाणी सेंट्रल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज या सीबीएससी नामांकित शाळेच्या प्राचार्या मिसेस सोनिया अंथोनी जोसेफ यांना भारत सरकारच्या निती आयोग मिनिस्ट्री ऑफ कार्पोरेट अफेअर्स टाइम्स नाऊ यांच्यावतीने भारत भूषण पुरस्कार  सीबीएसी सहोदया अहमदनगरच्या अध्यक्षा  दीपिका नगरवला यांच्या हस्ते  प्रदान करण्यात आला. 


 शाळेतील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासासाठी केलेले कार्य,शैक्षणिक गुणवत्ता, व्यवस्थापन कौशल्य ,प्रशासन मुलांची शैक्षणिक प्रगती दहावी बारावीचा निकाल शाळेतील विविध स्पर्धा परीक्षा या सर्व बाबतीत मिसेस सोनिया  जोसेफ यांच्या नेतृत्वात शाळेने खूप भरीव कार्य केले आहे.भारतभूषण समितीच्या वतीने मिसेस सोनिया अँथोनी जोसेफ यांना एज्युकेशन लीडर्स भारत भूषण सन्मान हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले .


सोनिया  जोसेफ यांचे संस्थेचे अध्यक्ष आदिनाथ वाणी संस्थेचे डायरेक्टर दत्तात्रय वाणी  शाळेचे उप प्राचार्य सागर कडू, व सर्व शिक्षक, पालक  व विद्यार्थी यांनी अभिनंदन केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत