राहुरी फॅक्टरी(वेबटीम) राहुरी फॅक्टरी येथे फिरत असलेल्या मनोरुग्णास नातेवाईकांच्या ताब्यात देऊन सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे काम टायगर ग्र...
राहुरी फॅक्टरी(वेबटीम)
राहुरी फॅक्टरी येथे फिरत असलेल्या मनोरुग्णास नातेवाईकांच्या ताब्यात देऊन सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे काम टायगर ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
टायगर ग्रूप राहुरी तालुक्याचे तालुका प्रमुख प्रथमेश भैय्या थोरात यांनी असे म्हटले की आम्ही टायगर ग्रूप चे पदाधिकारी आमचे प्रेरणास्थान यांच्या मार्गदर्शनाखाली 24तास सामाजिक कार्यात कार्यरत असतो.प्रथमेश भैय्या यांनी म्हटले की
०५ ऑक्टोबर देवळाली बंगला वैष्णवी चौक परिसरात तेजस सिनारे यांना एक अज्ञात व्यक्ती रात्री दहाच्या सुमारास फिरताना दिसून आली.त्यावेळी त्यांनी टायगर ग्रुपचे तालुका प्रमुख प्रथमेश थोरात यांना संपर्क केला. थोरात यांच्यासह श्रीराम चव्हाण,महेश सिनारे,यश सिनारे,मयूर सिनारे, रवी कदम,ज्ञाननेश्वर गागरे, आकाश शिंदे,गणेश तांबे, धनराज कदम आदी त्याठिकाणी पोहोचले. व्यक्तीस त्याचा नाव व पत्ता विचारला तर तो व्यक्ती मनोरुग्ण असल्याचे दिसून आले. त्याने नेवासा तालुक्यातील गोमळवाडी (वाटापुर शेजारील छोटे खेड गाव) येथील असल्याचे सांगितले. यावेळी प्रथमेश थोरात यांनी टायगर ग्रूप नेवासा तालुका पदाधिकारी प्रदीप काळे यांना संपर्क केला व त्यांनी वाटापुर येथील टायगर ग्रूप चे पदाधिकारी यांना संपर्क केला. गावातील पदाधिकारी यांनी रात्रीच्या वेळी त्या गावात जाऊन त्या व्यक्तीच्या घरा पर्यंत पोहचले. दुसऱ्या दिवशी म्हणजे दिनांक ०६ ऑक्टोबर रोजी त्या मनोरुग्ण व्यक्तीचे मावस मेहुणा हौशिराम बाबुराव थोरात व भाचा दिपक बाळासाहेब गलांडे हे दोघे जण येथे आले. व्यवस्थित पने सगळा घटना क्रम समजून सांगितला व त्यांच्याकडून त्यांची सगळी ओळख पटून घेतली आणि त्यांच्या ताब्यात त्या सदर मनोरुग्ण व्यक्तीला दिले. टायगर ग्रूप सदस्य आकाश गडाख,बंटी गर्जे, आदेश पंडीत,अनिकेत चव्हाण उपस्थित होते.
टायगर ग्रुपच्या ह्या सामाजिक कामाचे टायगर ग्रूप राष्ट्रीय संस्थापक जालिंदर जाधव, राष्ट्रीय अध्यक्ष तानाजी जाधव,अहील्यानगर जिल्हा अध्यक्ष बंटी भिंगारदेवे व नागरिकांनी कौतुक केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत