राहुरी(वेबटीम) श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार व अहमदनगर जिल्ह्यातील धुरंदर राजकारणी म्हणून समजले जाणारे भानुदास मुरकुटे यांच्य...
राहुरी(वेबटीम)
श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार व अहमदनगर जिल्ह्यातील धुरंदर राजकारणी म्हणून समजले जाणारे भानुदास मुरकुटे यांच्यावर राहुरी पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला असून माजी आ.मुरकुटे यांना अटक करण्यात आली असल्याची माहिती राहुरी पोलिसांनी दिली आहे.
राहुरी तालुक्यातील एका गावातील पीडित महिलेने याबाबत फिर्याद दिली असता राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून श्रीरामपूर येथून माजी आ.मुरकुटे यांना अटक केली असल्याचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी सांगितले.
भानुदास मुरकुटे यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. मुरकुटे यांना आज सकाळी राहुरी ग्रामीण रुग्णालयात मेडिकल करण्यासाठी नेण्यात आले. यावेळी डीवायएसपी बसबराज शिवपुजे, पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत