राहुरी/वेबटीम:- राहुरी फॅक्टरी येथील वैष्णवी चौक युवा प्रतिष्ठान यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या नवरात्रोत्सव कार्यक्रमात उमेद सोशल फाउं...
राहुरी/वेबटीम:-
राहुरी फॅक्टरी येथील वैष्णवी चौक युवा प्रतिष्ठान यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या नवरात्रोत्सव कार्यक्रमात उमेद सोशल फाउंडेशन यांच्या वतीने राहुरी येथील साईधाम हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत सर्व रोग निदान तसेच वंधत्व निवारण शिबिर आयोजित करण्यात आले होते.या शिबिरास परिसरातील नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला असून अनेक रुग्णांनी यात तपासणी केली आहे.
या शिबिरास साई आदर्श मल्टीस्टेट चेअरमन शिवाजीराव कपाळे, तसेच उमेद सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष अनिल साळवे, उपाध्यक्ष कुणाल तनपुरे,संजयजी निर्मळ,ऍड दीपक धीवर, सचिन साळवी, महिला समु उपदेशक मनीषा पोटे, गोपालजी शिंदे, श्रीकांत राऊत, रवी साखरे,दिलीप पुजारी आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमास साईधाम हॉस्पिटलचे डॉक्टर स्वप्नील माने व स्वप्नाली माने यांचे विशेष सहकार्य लाभले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैष्णवी चौक युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष वसंत कदम यांनी केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत