राहूरी फॅक्टरी/वेबटीम:- राहुरी फॅक्टरी येथील आदिनाथ वसाहत भागात महादेव मंदिर परिसरात श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार लहू कानडे यांच्या...
राहूरी फॅक्टरी/वेबटीम:-
राहुरी फॅक्टरी येथील आदिनाथ वसाहत भागात महादेव मंदिर परिसरात श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार लहू कानडे यांच्या निधीतून मंजूर झालेल्या सभामंडपाचे भूमिपूजन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अंकुश कानडे यांच्या हस्ते संपन्न झाले आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेल्य सभामंडपाच्या कामाचे भूमिपूजन आज काँग्रेसचे नेते अंकुश कानडे यांच्या हस्ते संपन्न झाले.
यावेळी संग्राम कानडे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व परिसरातील नागरिक उपस्थित होते.
यावेळी बोलताना अंकुश कानडे म्हणाले की,परिसरातील नागरिक देवदर्शनासाठी येताना त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी आमदार कानडे यांच्या माध्यमातून दहा लक्ष रुपयांचा सभामंडप मंजूर करण्यात आलाय याचा निश्चित परिसरातील नागरिकांना मोठा फायदा होणार आहे.
आमदार कानडे यांनी मंजूर केलेल्या या सभामंडपाचे समर्थनगर, गुरुकुल वसाहत, आदिनाथ वसाहत भागातील नागरिकांनी आमदार कानडे यांचे आभार मानले आहे.
परिसरातील जेष्ठ मंडळी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत