राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- देवळाली प्रवरा व राहुरी फॅक्टरी येथील विविध समस्याप्रश्नी सामाजिक कार्यकर्त्यांनी देवळाली प्रवराचे मुख्याधिकारी वि...
राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-
देवळाली प्रवरा व राहुरी फॅक्टरी येथील विविध समस्याप्रश्नी सामाजिक कार्यकर्त्यांनी देवळाली प्रवराचे मुख्याधिकारी विकास नवाळे व राहुरी येथील वनपरिक्षेत्र अधिकारी युवराज पाचारणे यांचे आज मंगळवारी लक्ष वेधले आहे.
देवळाली प्रवरा परिसरातील वाड्या वस्त्यावर बिबट्याने अक्षरक्षा: धुमाकूळ घातला असून बिबट्याच्या हल्ल्यात ठिकठिकाणी शेळ्या, बोकड, पाळीव कुत्रे ठार झाल्याची घटना घडल्या आहेत.
सध्या देवळाली प्रवरा परिसरात महावितरण कडून भारनियमन सुरू असल्यामुळे शेतकरी वर्गात बिबट्याच्या भीतीने घबराट पसरली आहे. बिबट्याचा वावर वाढला असून बिबट्याचा हल्ला मानवी जातीवर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
त्यामुळे देवळाली प्रवरा परिसरात ज्या भागात सतत बिबट्याचे दर्शन होते. सदर ठिकाणी वनविभागाने तातडीने पिंजरे लावावे अशी मागणी देवळाली प्रवरातील सामाजिक कार्यकर्त्यांच्यावतीने अधिकारी युवराज पाचारणे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
तसेच डॉ. तनपुरे कारखाना कामगार कॉलनीतील वाढलेले गवत व ठीक ठिकाणी तुंबलेल्या गटारी यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात असून देवळाली नगर परिषदेने या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवून वाढलेले गवत त्याचप्रमाणे तुंबलेले गटारी त्वरित स्वच्छ कराव्यात अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी माजी नगरसेवक डॉ.संदीप मुसमाडे,राजमुद्रा ग्रुपचे प्रशांत मुसमाडे,माजी नगरसेवक आदिनाथ कराळे,व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष सतीश वाळुंज,माजी उपनगराध्यक्ष अनंत कदम प्रहार जनशक्ती पक्षाचे आप्पासाहेब ढुस, युवराज लहामगे,विनोद कडू,निखिल गोपाळे,किरण चव्हाण,सिद्धार्थ साळुंके,सतीश साळवे,अमोल जाधव,पवन वैरागर,अक्षय निकाळजे आदी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत