हाॅटेलवर हल्ल्याचा निषेधार्थ ग्रामस्थ व्यावसायिक कडून पानेगांवात कडकडीत बंद - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

हाॅटेलवर हल्ल्याचा निषेधार्थ ग्रामस्थ व्यावसायिक कडून पानेगांवात कडकडीत बंद

पानेगांव (वार्ताहर) नेवासे तालुक्यातील पानेगांव येथील शिरेगांव रोड लगत असलेल्या हाॅटेल आमराई परमीट रुम मध्ये दि.१८रोजी सकाळी ६:३०वाजता दरम्य...

पानेगांव (वार्ताहर)



नेवासे तालुक्यातील पानेगांव येथील शिरेगांव रोड लगत असलेल्या हाॅटेल आमराई परमीट रुम मध्ये दि.१८रोजी सकाळी ६:३०वाजता दरम्यान तीन सराईत गुन्हेगारांनी हाॅटेल मध्ये घुसून तोडफोड नासधूस व दारुच्या बाटल्या लुटून गल्यातील रक्कम लुटून हाॅटेल मालकाला मारहाण करण्यात आली.या निषेधार्थ  ग्रामस्थ, व्यावसायिक कडून पानेगांवात कडकडीत बंद पाळण्यात आला.

यावेळी महादेव देवस्थानच्या सभामंडपात निषेध सभेचं आयोजन करण्यात आले.सुरुवातीला उपसरपंच दत्तात्रय घोलप यांनी झालेल्या घटनेचा जाहिर निषेध व्यक्त करुन परीसरातील  वाळू तस्करी करणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांना आळा बसण्यासाठी नेहमी प्रमाणे राजकारण विरहित एकत्र येवून पायबंद घालून चपराक देवून कायदेशीर यांच्यावर कारवाईची मागणी केली.

शिवस्मारक समितीचे अध्यक्ष किशोर जंगले यांनी म्हटले कि, आपला मुळाथडी परीसर हा एकोपा असून  सर्व समाज गुण्यागोविंदाने नांदत आहे असले प्रकार खपवून घेतले जाणार नसून वेळ प्रसंगी गुंड प्रवृत्ती मोडण्यासाठी आपण सर्व ग्रामस्थ मिळून जसास तसे उत्तर देवू.

मुळाचे संचालक मा.लोकनियुक्त सरपंच संजय पाटील जंगले यांनी सांगितले की, घटनेचा जाहिर निषेध करुन तातडीने सोनई पोलीस अधिकारी तसेच कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट देऊन तातडीने आरोपी जेरबंद केले यावेळी अभिनंदनाचा ठराव संमत करण्यात आला त्यामध्ये जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला सो, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलूबर्मे पाटील, शेवगाव उपअधिक्षक सुनिल पाटील, यांचा मागदर्शनाखाली सोनई पोलीस ठाण्याचे सपोनि विजयकुमार माळी ,उपनिरीक्षक सुरज मेढे, पोलीस नाईक बाळासाहेब तागड,  हेडकॉन्स्टेबल गोरक्षनाथ जावळे, पो.हे का. वजीर शेख कर्मचारी यांनी काही तासातच आरोपी जेरबंद केले त्यांचा सोनई पोलीस ठाण्यात जाऊन यथोचित सन्मान करण्यात येणार असल्याचं जंगले यांनी सांगितलं.


यावेळी माजी उपसरपंच रामराजे जंगले, सतिश जंगले, बंडू जंगले, डॉ काकडे, अनिल जंगले ,बाळासाहेब जंगले, जालिंदर जंगले,विजय जंगले, राजेंद्र शेंडगे, रमेश गुडधे, सुनिल जंगले, लक्ष्मण गागरे,विशाल जंगले बाबासाहेब जिवरक,रोहिदास चिंधे, शिवाजी जंगले, वसंत जंगले, ज्ञानेश्वर जंगले,मनोज आंबेकर आनंद जंगले, चंद्रकांत टेमक,करजगांवचे उपसरपंच सतिश फुलसौंदर,संभाजी जंगले, पोपट जंगले,अमोल कापसे,बापू जंगले, लक्ष्मीकांत जंगले,साहेबराव जंगले बबनराव जंगले,ज्ञानेश्वर नवगिरे, सुभाष गुडधे,सुरज जंगले आदींसह ग्रामस्थ व्यावसायिक उपस्थित होते.


 मुळाथडी परीसर हा तीन तालुक्याचा संपर्क येत असून पश्चिमेला राहुरी उत्तरेला श्रीरामपूर, पुर्वेला नेवासे हा भाग प्रशासनाच्या वतीने दुर्गम भाग म्हणून ओळखला जातो येथे कुख्यात गुंडांचा वावर येथे मोठ्या प्रमाणावर असल्याने कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण होत असतो, विद्यार्थ्यांनींचे छेड काढण्याचे प्रकार येथे घडलेले आहे.यासाठी जवळपास दहा गांवाच मध्यवर्ती ठिकाण पानेगांव करजगांव परीसरात पोलीस चौकी असावी यासाठी परीसरातील ग्रामपंचायत ठराव घेवून जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला सो,अहिल्यानगर, तसेच नाशिक परिक्षेत्र आय.जी दत्तात्रय कराळे सो,यांना भेटणार. 
लोकनियुक्त संजय जंगले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत