गुहा व कानडगाव येथील भाजप कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

गुहा व कानडगाव येथील भाजप कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश

राहुरी(प्रतिनिधी) राहुरी-नगर-पाथर्डी विधानसभा मतदार संघांमध्ये तरुणांचा वाढता ओघ आमदार प्राजक्त तनपुरे यांना पाठींबा  देत असल्याचे चित्र ताल...

राहुरी(प्रतिनिधी)



राहुरी-नगर-पाथर्डी विधानसभा मतदार संघांमध्ये तरुणांचा वाढता ओघ आमदार प्राजक्त तनपुरे यांना पाठींबा  देत असल्याचे चित्र तालुक्यातील निर्माण झाले आहे. तालुक्यातील गुहा तसेच कानडगाव मध्ये अनेक भाजप कार्यकर्त्यांनी आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या हस्ते राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केल्याने हा भाजपाला धक्का मानला जात आहे.

   गुहा येथील सोसायटीचे माजी चेअरमन शरद गोरक्षनाथ कोळसे यांनी भाजपाला रामराम करत तुतारी हाती घेतली आहे. यावेळी कुरणवाडी योजनेचे अध्यक्ष रघुनाथ मुसमाडे, प्रेरणा मल्टीस्टेटचे चेअरमन सुजित वाबळे,बापूसाहेब कोबरणे, डाॅ.रविंद्र गागरे, सोपान हिरगळ, मंजाबांपू कोबरणे, नंदकुमार तनपुरे उपस्थित होते तर  कानडगाव येथील विशाल लोंढे, लक्ष्मण संसारे, महेश लोंढे, बाबासाहेब लोंढे, मारुती लोंढे, गणेश लोंढे, सुधाकर लोंढे, आकाश संसारे, किसन गांगुर्डे, सागर बर्डे, सावळेराम गागरे, सिताराम महाराज, सुनील लोंढे, सुभाष लोंढे, संजय बर्डे, गोरख संसारे, दिलीप लोंढे, मच्छिंद्र लोंढे, दत्तात्रय लोंढे यांनी देखील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केल्याने आता या परिसरात आमदार तनपुरे यांची ताकद वाढली असल्याचे बोलले जात आहे.


देसवंडी येथील तरुणांचा तनपुरे यांना पाठिंबा

   देसवंडी येथील अनेक तरुणांनी आमदार प्राजक्त तनपुरे यांना पाठींबा दिला आहे. तुषार कोकाटे, सौरभ तमनर, किशोर शिरसाट, इरफान पठाण, नितीन बोर्डे, सुमित माने, अमोल तमनर, अविनाश शिरसाट, बब्बु पठाण, विकास शिरसाट  बाबासाहेब कोकाटे, नितीन कोकाटे, भाऊराव तमनर, सिद्धार्थ ताठे, सौरभ शिरसाठ, श्रीकांत ताठे, अजय बोर्डे, विकी बोर्डे, सतीश शिरसाट, अजय कोकाटे, अनिकेत शिरसाट, गणेश चव्हाण, निखिल बोर्डे, राहुल पेंढारे, तेजस शिरसाट आदि उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत