मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्या होणारी श्रीरामपूरची सभा पुढे ढकलली - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्या होणारी श्रीरामपूरची सभा पुढे ढकलली

राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांच्या प्रचारार्थ उद्या सोमवार ११ नोव्हे...

राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-


श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांच्या प्रचारार्थ उद्या सोमवार ११ नोव्हेंबर रोजी दुपारी श्रीरामपूर येथील थत्ते ग्राउंड येथे आयोजित करण्यात आलेली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा रद्द करण्यात आली आहे अशी माहिती जिल्हाप्रमुख नितीन औताडे यांनी दिली आहे.

श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी  अजित पवार गटाने लहू कानडे यांना पक्षप्रवेश देऊन उमेदवारी बहाल केली तर शिवसेना शिंदे गटाने भाऊसाहेब कांबळे यांना उमेदवारी घोषित केले. महायुतीचे दोन उमेदवार झाल्याने नेमकी अधिकृत कोण याबाबत मतदारसंघात चर्चा सुरू झाली. अर्ज माघारीच्या दिवशी भाऊसाहेब कांबळे  अर्ज माघारी घेतील असे बोलले जात होते.किंबहुना त्यांच्यावर दबावही येत होता.मात्र  भाऊसाहेब कांबळे अर्ज माघारीच्या आदल्या दिवशी नॉटरीचेबल झाले.

 दरम्यान महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी लहू कानडे यांच्या प्रचाराचा शुभारंभ केला. प्रसंगी लहू कानडे हेच महायुतीचे उमेदवार असतील असे स्पष्ट संदेश दिले. त्यानंतर शिंदे गटाचे सचिव भाऊसाहेब चौधरी यांनी माध्यमांशी बोलताना सोमवार ११ रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भाऊसाहेब कांबळे यांच्यासाठी श्रीरामपूर येथे सभा होणार असल्याचे सांगितले.त्यानुसार कार्यकर्ते कामाला लागले.

 दरम्यान  उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची श्रीरामपूरात होणारी सभा भाऊसाहेब कांबळे यांची तब्येत बिघडल्याने पूढे ढकलण्यात आली असल्याचे नितीन औताडे यांनी पत्रकाद्वारे सांगितले आहे.

काय म्हंटलय जिल्हाप्रमुख औताडे यांनी प्रसिद्धी पत्रकात

श्री. भाऊसाहेब मल्हारी कांबळे यांच्या प्रचारार्थ उद्या सोमवार दि.११/११/२०२४ रोजी दुपारी १.४५ वाजता मा. मुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांची होणारी जाहीरसभा श्रीरामपूर विधानसभा मतदार संघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री. भाऊसाहेब मल्हारी कांबळे यांची तब्येत बरी नसल्याने पुढे ढकलण्यात आली आहे. याची सर्वांनी नोंद घ्यावी. हि विनंती

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत