श्रीरामपूर(वेबटीम) परवा राधाकृष्ण विखेंनी साथ सोडली, आज मुख्यमंत्र्यांनीही पाठ फिरवली त्यामुळे हवालदिल झालेल्या भाऊसाहेब कांबळे यांना अस्वस्...
श्रीरामपूर(वेबटीम)
परवा राधाकृष्ण विखेंनी साथ सोडली, आज मुख्यमंत्र्यांनीही पाठ फिरवली त्यामुळे हवालदिल झालेल्या भाऊसाहेब कांबळे यांना अस्वस्थ वाटू लागल्याने श्रीरामपूर शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल व्हावे लागल्याचे पुढे आले आहे.
श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात माजी आमदार भाऊसाहेब कांबळे हे शिवसेनेचे शिंदे गटाचे उमेदवार म्हणून फायनल होते मात्र ही जागा लहू कानडे यांनी महायुतीत जाऊन मिळवली. त्यामुळे कांबळेची कोंडी झाली, तरीही ते थांबले नाहीत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन पक्षाचा एबी फॉर्म आणला तो भरलाही. मात्र अर्ज माघारी वेळी दबाव असताना ते मागे हटले नाहीत.
अर्थात त्यावेळी त्यांना राधाकृष्ण विखे पाटलांची ताकद मागे उभी होती, परंतु त्यांनी दोन दिवसापूर्वी कांबळेवर निशाणा साधत कानडे हेच आपले उमेदवार असल्याचे सांगितले त्यामुळे अस्वस्थ झालेल्या मुख्यमंत्री शिंदे यांच्या सोमवारच्या दौऱ्याची मोठी आशा होती. मात्र ,अचानक हा दौराही पुढे ढकलल्याचे समजले, त्यामुळे भाऊसाहेब कांबळे आता आणखी अस्वस्थ झाले असून यातून त्यांना थेट रुग्णालयात भरती करावी लागल्याचे छायाचित्र माध्यमांमध्ये फिरताना दिसत आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत