मॉर्डन लाईफ स्टाईल मध्ये आयुर्वेद रिसर्च आव्हान... डॉ प्रशांत दळवी - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

मॉर्डन लाईफ स्टाईल मध्ये आयुर्वेद रिसर्च आव्हान... डॉ प्रशांत दळवी

राहुरी फॅक्टरी(वेबटीम)  श्री विवेकानंद नर्सिंग होम आयुर्वेद महाविद्यालय व चिकित्सालय च्या सत्र २०२४-२५ मध्ये प्रथम वर्ष आयुर्वेद (बि.ए. एम.ए...

राहुरी फॅक्टरी(वेबटीम)



 श्री विवेकानंद नर्सिंग होम आयुर्वेद महाविद्यालय व चिकित्सालय च्या सत्र २०२४-२५ मध्ये प्रथम वर्ष आयुर्वेद (बि.ए. एम.एस)अभ्यासक्रमाकरीता प्रवेशित विद्यार्थी व पालकांची संयुक्त सभा महाविद्यालय मध्ये संपन्न झाली.



प्राचार्य डॉक्टरेट अनंतकुमार व्ही शेकोकार यांच्या अध्यक्षतेखाली सुरु झालेल्या शिष्योपनयन संस्कार शिबीराचे उद्घाटन आर ए पोद्दार आयुर्वेद कॉलेज चे प्राध्यापक डॉ प्रशांत दळवी  यांच्या हस्ते, प्रमुख पाहुणे माजी प्राध्यापक  डॉ. गायकवाड पी. बी, आयोजन समितीचे अध्यक्ष प्रा.डॉ. विलास कड, समिती सचिव डॉ. तुपे एम. बी, समन्वयक डॉ उज्ज्वला कड, डॉ. संगीता कानडे , डॉ.स्नेहा भोकरे, डॉ स्नेहा बेडेकर , डॉ अनिकेत घोटनकर यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.


सर्व नवप्रवेशित विद्यार्थ्यांना नोट बुक व पेन  देऊन स्वागत करण्यात आले, याप्रसंगी उद्घाटक म्हणून बोलतांना डॉ. विलास कड यांनी  आयुर्वेद महाविद्यालयाच्या वतीने राबविल्या जात असणाऱ्या विविध आगळ्यावेगळ्या उपक्रमांची मुक्तकंठाने प्रशंसा केली. डॉ प्रशांत दळवी यांनी मार्गदर्शन करताना सांगितले कि विद्यार्थ्यांनी रुग्णाच्या दुःखात सहभागी होऊन , चांगला चिकित्सक होण्याकरीता सतत धडपड करावी. जे जे चांगले आहे ते ते मिळविण्याचा प्रयत्न करावा. आपण समाजाचे देणे लागतो असा कृतज्ञनेचा भाव मनात ठेवून काम करावे असे कळकळीचे आवाहन केले. प्रमुख पाहुणे डॉ गायकवाड पी बी ह्यांनी सांगितले की सुरवाती पासुन विद्यार्थी यांनी मुळ ग्रंथातून अभ्यास करावे जेणेकरून विषयाचा सखोल अभ्यास होतो.


 याप्रसंगी बोलतांना प्राचार्य डॉ अनंतकुमार शेकोकार यांनी महाविद्यालयाचा व रुग्णालयाचा मागील ३४ वर्षाचा आढावा सादर करुन विद्यार्थ्यांनी संशोधन वृत्ती कशी विकसित करावी ह्याचे आपल्या मार्मिक शैलीत उदाहरण देऊन विद्यार्थ्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. डॉ . अनुजा वळसंगे ह्यांनी पुढील शैक्षणिक वर्षाच्या वाटचालीची ब्ल्यू प्रिंट वर्णन केली सिनियर विद्यार्थी श्रुती कर्डिले, राहुल बोने, अक्षता रोडे यांनी विविध परीक्षा व त्यातील फलश्रुतीसह महाविद्यालयातिल पाळावयाच्या नियमांची माहिती विषद केली.

संस्थेचे प्राधिकृत अधिकारी श्री दीपक पराये साहेब ह्यांनी दृकश्राव्य पध्दतीने सर्व नूतन विद्यार्थी व पालक ह्यांनी महाविद्यालयला प्राधान्याने पसंति देऊन प्रवेश घेतला त्याबद्दल कौतुकास्पद उदगार काढून अभिनंदन व आभार व्यक्त केले 

सुरक्षा अधिकारी विजय गवळी , बाळू डोंगरे व मधुकर अडाव यांनी विद्यार्थ्यांसह पालकांना संपूर्ण परिसराचे भ्रमण घडविले. डॉ. माधुरी भळगट, डॉ अश्विनी बोरा, डॉ ज्योती चोपडे, डॉ कांचन शेकोकार, डॉ छाया निबे व डॉ भागवत वीर यांनी रुग्णालयातील उपलब्ध सुविधा व प्रगतीचा आलेख सादर केला. सुप्रसिध्द फार्मसी अध्यापक डॉ. किरण जावळे, डॉ उल्का म्हसे, डॉ राजश्री वने ह्यांनी आयुर्वेद मेडिसिन चे वर्णन केले. प्रा. डॉ. प्रमिला नलगे व उपप्राचार्य डॉ संतोष बांगर यांनी वेगवेगळ्या विषयांवर मार्गदर्शन केले. योगशिक्षक रिसगुड यांच्यामार्फत योगशिक्षण व संस्कृत शिक्षीका उज्ज्वला कड , डॉ प्रज्ञा गाडेकर व डॉ प्रांजली खरात यांच्यामार्फत संस्कृतसंहिता ओळख हे सत्र नियमित चालवण्यात येत आहे. १५ दिवसीय शिष्योपन्यानिय संस्काराचा समारोप २९ नोव्हेंबरला होईल, कार्यक्रमाचे संचालन प्रा. डॉ माधुरी कुळकर्णी  यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. डॉ. एम बी तुपे यांनी मानले, अल्पोहारने उद्घाटन समारंभाची सांगता झाली. या कार्यक्रमाकरिता शिक्षकेत्तर कर्मचारी सिध्देश्वर सूर्यवंशी, योगेश जाधव, ज्ञानेश्वर टिक्कल, अण्णा देवकाते, विठ्ठल देवरे, गोविंद भांड, समीर शेख, नवनाथ तारडे व मोहन देठे ह्यांनी परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत