राहुरी फॅक्टरी(वेबटीम) दिवाळी भाऊबीजसाठी बहिणीकडे साडी घेऊन निघालेल्या भावावर काळाने घातला असून राहुरी तालुक्यातील चिंचोली फाटा शिवारात अज्ञ...
राहुरी फॅक्टरी(वेबटीम)
दिवाळी भाऊबीजसाठी बहिणीकडे साडी घेऊन निघालेल्या भावावर काळाने घातला असून राहुरी तालुक्यातील चिंचोली फाटा शिवारात अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू झाला आहे. एकेरी वाहतुकीमुळे या तरुणाला मृत्यूचा सामना करावा लागला आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, बीड जिल्ह्यातील शिरूर कासार येथील कान्होबाची वाडी येथील २७ वर्षीय तरुण दत्ता पांडुरंग मोरे हा १ नोव्हेंबरच्या रात्री एम.एच.१७- सी-यु-३७६४ या क्रमांकाच्या दुचाकीवरून संगमनेर येथे भावबीजेसाठी बहिणीला साडी घेऊन जात असताना नगर-मनमाड मार्गावर चिंचोली फाटा येथील हॉटेल द्वारका परिसरात एकेरी वाहतूक सुरू असलेल्या ठिकाणी अज्ञात वाहनाने जोराची धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. घटनास्थळी माजी सरपंच गणेश हारदे, अशोक टकले, योगेश वाघ, योगीराज कुलकर्णी आदिंसह नागरिकांनी मदतकार्य केले.
रुग्णवाहिका चालक रवी देवगीरे यांच्या मदतीने मृतदेह शवविच्छेदनासाठी राहुरी येथे पाठविण्यात आला.घटनास्थळी पोलीस हेडकॉन्स्टेबल सोमनाथ जायभाये यांनी पंचनामा केला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत