राहुरी(वेबटीम):- देवळाली प्रवरा सोसायटीच्या चेअरमनपदी शहाजी कदम तर व्हाईस चेअरमनपदी दिलीप मुसमाडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. आ...
राहुरी(वेबटीम):-
देवळाली प्रवरा सोसायटीच्या चेअरमनपदी शहाजी कदम तर व्हाईस चेअरमनपदी दिलीप मुसमाडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
आज पाडव्याच्या दिवशी देवळाली सोसायटीच्या चेअरमन व व्हॉइस चेअरमन पदाची निवड प्रकिया सकाळी सोसायटीच्या सभागृहात ही निवड प्रकिया पार पडली. रोटेशन नुसार दर वर्षी चेअरमन व व्हा.चेअरमन निवड दिवाळी पाडव्याला केली जाते.
यावेळी चेअरमनपदी शहाजी कदम यांची तर व्हा.चेअरमनपदी दिलीप मुसमाडे यांची निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी एस.सी.वासकर यांनी काम पाहिले. नूतन पदाधिकाऱ्यांचा माजी आ.कदम यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
यावेळी माजी आ.चंद्रशेखर कदम, माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम, माजी नगराध्यक्ष मुरलीधर कदम, गोरखनाथ मुसमाडे, मच्छीन्द्र कदम, सोपान शेटे, माजी उपनगराध्यक्ष प्रकाश संसारे, सचिन ढुस, भाजप शहराध्यक्ष अजित चव्हाण,मावळते चेअरमन उत्तम मुसमाडे व्हाईस चेअरमन संगीता वाळुंज,, सुदाम भांड,संतोष चव्हाण,बाबासाहेब शेटे,मंजाबापू वरखडे,सूर्यभान गडाख, सुधीर टीक्कल, स्वरूपा कदम,सचिन शेटे, सतिष वने,संस्थेचे सचिव ,गणेश चव्हाण ,दत्तात्रय कुशाबा कदम,अनिल भाऊसाहेब कदम,सावळेराम कदम,शहादेव कांबळे आदिसह सभासद , संस्थेचे कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत