श्रीरामपूर/वेबटीम:- श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात महायुतीत फूट पडली असून महायुतीचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे लहू कानडे व शिवसे...
श्रीरामपूर/वेबटीम:-
श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात महायुतीत फूट पडली असून महायुतीचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे लहू कानडे व शिवसेना शिंदे गटाचे भाऊसाहेब कांबळे या दोघांपैकी कोणीही आपला उमेदवारी अर्ज माघारी न घेतल्यामुळे या ठिकाणी महायुतीचे दोन उमेदवार असणार असणार आहे तर त्यांच्या विरोधात काँग्रेसचे हेमंत ओगले हे उमेदवारी करणार आहेत. कानडे, कांबळे व ओगले अशी तिरंगी लढत होणार आहे.
आज अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी कानडे की कांबळे कोण अर्ज माघार घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होते यात दोघांनीही कोणीही आपला उमेदवारी अर्ज माघार घेतला नाही त्यामुळे आता श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात तिरंगी सामना होणार आहे.
आज अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी संजय परसराम छत्तीसे, संतोष भाऊसाहेब कांबळे ,प्रकाश मार्शल संसारे ,चेतना प्रवीण बनकर, शाम शंकर कानडे ,सदाशिव किसन लोखंडे अशोक बागुल सुभाष त्रिभुवन,दीपक त्रिभुवन, विजय खाजेकर, प्रशांत सदाशिव लोखंडे संदीप रमेश मगर यांनी आपले उमेदवारी अर्ज माघार घेतले आहेत.
तर राहुरी फॅक्टरी येथील शांती चौक मित्र मंडळाचे अध्यक्ष दीपक त्रिभुवन यांनी मागील आठवड्यातच परिवर्तन महाशक्ती कडून शेतकरी संघटनेत प्रवेश करून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता.तर आज अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी त्रिभुवन यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेत काँग्रेस पक्षात श्रीरामपूर नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष करण ससाणे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत