राहूरी/वेबटीम:- जि.प.सदस्य धनराज गाडे यांच्यामुळे बारागाव नांदूर गटात आपली ताकद निश्चित वाढली असून यापूर्वी दोनदा स्व. शिवाजीराजे गाडे यांच...
राहूरी/वेबटीम:-
जि.प.सदस्य धनराज गाडे यांच्यामुळे बारागाव नांदूर गटात आपली ताकद निश्चित वाढली असून यापूर्वी दोनदा स्व. शिवाजीराजे गाडे यांच्यामुळेच आपण विजय प्राप्त केला होता. आता गाडे कुटुंबाच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे राहणार असल्याचे भाजपा व महायुतीचे उमेदवार शिवाजीराव कर्डिले यांनी सांगितले.
राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर कुरणवाडी चिंचाळे गडदे आखाडा घोरपडवाडी मल्हारवाडी मोमीन आखाडा या परिसरात भाजपा व महायुतीचे उमेदवार शिवाजीराव कर्डिले यांनी झंजावती प्रचार दौरा केला यावेळी मतदारांशी संवाद साधताना ते बोलत होते.
शिवाजीराव कर्डिले यावेळी पुढे म्हणाले की पाच वर्षांपूर्वी धनराज गाडे यांचा भाजपा मध्ये प्रवेश ठरला होता परंतु त्यांच्यावर विरोधकांनी दबाव आणून प्रवेश होऊ दिला नाही परंतु त्यानंतर पाच वर्ष सत्ता असताना ज्या शेतकरी मंडळाच्या कार्यकर्त्यांमुळे सत्ता मिळाली त्यांना सापत्न वागणूक दिली गेली. धनराज गाडे यांचे वर्चस्व वाढू नये यासाठी प्रयत्न केले त्यांना आता जनताच धडा शिकवणार आहे. राज्य सरकारने गेल्या काही दिवसांपासून राबविलेल्या लाडकी बहीण योजना मुळे महिला वर्ग समाधानी दिसत असून बारागाव नांदूर परिसरात आपल्या आमदारकीच्या काळात अनेक विकासाची कामे झाली. धनराज गाडे आपल्या समवेत आल्याने यावेळी नक्कीच जनता आपल्याला निवडून देईल असा विश्वास कर्डिले यांनी यावेळी व्यक्त केला.
जि.प.सदस्य धनराज गाडे म्हणाले की, शिवाजीराजे गाडे यांनी स्थापन केलेल्या शेतकरी मंडळाचे सर्व सामान्य कार्यकर्ते आपल्या सोबत आहेत. आज खऱ्या अर्थाने आम्हाला ताकद देण्याचे काम माजी मंत्री कर्डिले यांनी केले असून मागील वेळी आमची चूक झाली यावेळी कर्डिले यांना आमदार करून चूक सुधारणार आहे. पक्षात असताना त्यांनी मोठ्या प्रमाणात त्रास देण्याचे आणि माझे वर्चस्व कमी करण्याचे काम केले असे धनराज गाडे यांनी यावेळी सांगितले.
याप्रसंगी नगर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती रभाजी सुळ, जि.प.सदस्य धनराज गाडे, माजी जि.प.सदस्य विक्रम तांबे, भाजपा तालुकाध्यक्ष सुरेश बानकर, युवराज गाडे, मुळा प्रवरा वीज संस्थेचे संचालक शिवाजी सागर, अण्णासाहेब बाचकर शिवाजी सयाजी गाडे, यमनाजी आघाव, राजेंद्र गोपाळे, सुकुमार पवार, कैलास पवार, अशोक घाडगे, अंकुश बर्डे, अविनाश बाचकर, सारंग खिलारी, शिवाजी केदार, बाबासाहेब कोळसे, बाबासाहेब वडीतके, बाळासाहेब गडधे, संदीप बाचकर, बापुसाहेब गडधे, सयाजी श्रीराम, हरिभाऊ हापसे, आप्पासाहेब बाचकर, काकासाहेब येवले, बाबासाहेब शिंदे, बाळासाहेब शिंदे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत