राहुरी(वेबटीम) राहुरी विधानसभा मतदारसंघ भाजप महायुतीचे उमेदवार माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या प्रचारात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटी...
राहुरी(वेबटीम)
राहुरी विधानसभा मतदारसंघ भाजप महायुतीचे उमेदवार माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या प्रचारात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विशेष लक्ष घातले आहे. विखे यांनी राहुरी येथे पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांची एकत्रित बैठक घेऊन मार्गदर्शन केले. आगामी काळात राज्यात महायुतीचे सरकार येणार आहे. यात राहुरीतून शिवाजीराव कर्डिले यांच्या सारखा कर्तव्य दक्ष लोकप्रतिनिधी विजयी झाला पाहिजे.राहुरी तालुक्यातील लोकप्रतिनिधीकडे मंत्रिमंडळात सहा खाते होती. तरीही त्यांना विकासाच्या योजना राबवता आल्या नाही. डीपी बसवण्याचे काम केले त्याचे पैसे देखील शेतकऱ्याकडून घेतले जात होते, अशी टीका पालकमंत्री विखे पाटील यांनी यावेळी केली.
बैठकीस माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले, अक्षय कर्डिले, राजू शेटे, धनराज गाडे, देवेंद्र लांबे, अण्णासाहेब भास्कर, सत्यजित कदम, सुरसिंग पवार, उत्तम मसे, साईनाथ कोळसे, सूर्यभान मसे, रवींद्र मसे, अमोल भनगडे, विलास साळवे, उदयसिंग पाटील, नामदेव ढोकणे, दिलीप जठार, विठ्ठल हारदे, लक्ष्मण धाडगे, किरण धनवट आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विखे पाटील पुढे म्हणाले, कार्यकर्त्यांनी आपसातील गटबाजी संपुष्टात आणून शासनाच्या विविध योजना जनतेपर्यंत पोहोचवाव्यात. राज्यात महायुतीचे सरकार येणार आहे. तरी आपल्या तालुक्यातील आमदार हा देखील भाजपचाच असावा. महायुतीचे व आघाडीचे अडीच वर्षामध्ये कोणत्या सरकारची कामगिरी चांगले आहे हे जनतेला माहित आहे. विधानसभेची निवडणूक ही राज्य आणि तालुक्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. कार्यकर्त्यांनी निवडणूक हाती घेऊन राज्याच्या भविष्यासाठी महायुतीचे सरकार आणावे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून अनेक वर्षाचा प्रलंबित निळवंडे चा प्रश्न मार्गी लावला. धमक्या देणाऱ्यांना भीक घालू नका. राहुरी विधानसभा मतदारसंघासाठी कर्तव्यदक्ष उमेदवार मिळालेला आहे
माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले म्हणाले की, राहुरी विधानसभा मतदारसंघातून मी तीन निवडणुका लढवल्यात. दोन जिंकल्या, एका निवडणुकीत पराभव झाला. आता पुन्हा 2024 ची निवडणूक लढवीत असून ही निवडणूक जनतेनेच हातात घेतली आहे. गावोगावी मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता आपला विजय निश्चित झाला आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे माझ्यासाठी खूप वेळ देत आहेत. तनपुरे कुटुंबियांकडून दहशत निर्माण करून कार्यकर्त्यांना धमक्या दिल्या जात आहेत. मात्र आम्ही ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावरच लढवीत आहोत. पिक विमा, दुधाचे अनुदान, लाडकी बहीण योजना, मुलींचे उच्च शिक्षण आदी योजना यशस्वीपणे राबवल्या आहेत. राहुरी सहकारी साखर कारखाना चालू करण्यासाठी जिल्हा बँक नेहमीच मदत करील. कारखाना हा आपल्या शेतकऱ्यांचा कामधेनु आहे. शेतकऱ्यांना प्रवरा सहकारी साखर कारखान्याने ऊसाला 3200 भाव दिला आहे.
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी माझ्या प्रचाराच्या नियोजनासाठी राहुरी तालुक्यातील कार्यकर्त्यांची बैठक बोलून काम करण्याच्या सूचना दिल्या आहे. आता तनपुरे यांचा पराभव निश्चित झाला असून त्यांच्या पायाखालची वाळू सरकले असल्यामुळे माझी बदनामी सुरू केले आहे. मात्र खरी दहशत तनपुरे कुटुंबाची आहे. मी पंधरा वर्षे राहुरी तालुक्यात फिरत असताना कधी कोणाला शिवी दिली नाही , कानफाटात मारली नाही , वाळू ठेकेदारी केली नाही .उलट तनपुरे कुटुंबियांनीच राहुरी शहरालगतच्या जागा बळकवल्या. त्यावर आरक्षण टाकले. कमी भावात जमिनी घेतल्या. माझ्यामुळे तरी त्यांच्या दहशतीवर आळा बसला असल्याचे मत माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी व्यक्त केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत