राहुरी(प्रतिनिधी) राज्यामधे विश्वासघाताने आलेल्या महायुती सरकारने भष्टाचाराच्या सगळ्या पातळ्या ओलांडल्या आहेत. सर्वांचे अराध्य दैवत छत्रपत...
राहुरी(प्रतिनिधी)
राज्यामधे विश्वासघाताने आलेल्या महायुती सरकारने भष्टाचाराच्या सगळ्या पातळ्या ओलांडल्या आहेत. सर्वांचे अराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यात सुद्धा यांनी पैसे खाल्ले म्हणुन सहा महिन्यातच हा पुतळा जमीनदोस्त झाला आहे. आणि हे आपल्याला हिंदुत्व शिकवतात अन् मुख्यमंञी म्हणतात की, वारे असल्यामुळे हा पुतळा पडला आहे. असे बेजबाबदारपणे उत्तर देणाऱ्या मुख्यमंत्र्यांची पदावर राहायची लायकी तरी आहे का ? असा घणाघात आमदार प्राजक्त तनपुरे यांनी थेट मुख्यमंत्र्यांवर केला आहे.
राहुरी तालुक्यातील वळण, वळण-प्रिप्री, चंडकापुर आदि गावात महाविकास आघाडीचे उमेद्वार आमदार प्राजक्त तनपुरे यांनी भेटी देत मतदारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी थेट मुख्यमंञी, ग्रहमंञी तथा युती सरकारवर घनाघात केला ते म्हणाले की, स्वतःची खुर्ची वाचविण्यासाठी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महिला सशिक्षीमीकरण म्हणून लाडकी बहीण योजना सुरू केली मात्र बदलापूर येथे शाळकरी मुलीवर शाळेत अत्याचार झाला. त्यावेळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी विलंब करण्यात आला पोलिसांनी अत्यंत हलगर्जीपणा केला महिलांवरील अत्याचाराबाबत या राज्यामध्ये सरकार जर सक्षम नसेल तर गृहमंत्री यांची देखील पदावर रहायची लायकी आहे का. ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था ही शेतीवर अंबलुन आहे त्यामुळे महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात आपण शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी केली तसेच मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत मतदार संघात दिवसा वीज मिळावी म्हणून प्रकल्प उभे केले. शेतकऱ्यांना मागेल त्याला ट्रांसफार्मर दिले. मतदार शेकडो कोटी रूपयांची विकासकामे केली. आपल्या तालुक्यातील स्थानिक आमदारच आपल्या गरजा ओळखु शकतो म्हणून अडीच वर्षाच्या मंत्रिपदाच्या काळात जागतीने विकास कामे केली त्याच्या दुप्पट गतीने आगामी काळात आपण विकास काम करू असा विश्वास यावेळी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी व्यक्त केला.
याप्रसंगी प्रदेश युवक अध्यक्ष गणेश भोसले, सरपंच सुरेश मकासरे, उपसभापती बाळासाहेब खुळे, बाळासाहेब शिंदे, अशोक कुलट, ज्ञानेश्वर खुळे, उमेश खिलारी, प्रकाश आढाव, बी.आर.खुळे, देवानंद मकासरे, वसंत कार्ले, रमन खुळे, बाबासाहेब आढाव, मुकुंदा काळे, रघुनाथ खिलारी, सिताराम गोसावी, भानाभाऊ खुळे, जैन्युदिन शेख, प्रकाश आढाव, विलास आढाव, पिराजी वाघमारे, रोहिदास रंधे, अदिनाथ गडाख,कैलास देशमुख आदिंसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते
कोणत्याही टिप्पण्या नाहीत