श्रीरामपूर/वेबटीम:- श्रीरामपूर शहरात काँग्रेसला मोठे खिंडार पडले असून श्रीरामपूर नगरपरिषदेचे ३ माजी उपनगराध्यक्ष व अनेक माजी नगरसेवकांनी आज ...
श्रीरामपूर/वेबटीम:-
श्रीरामपूर शहरात काँग्रेसला मोठे खिंडार पडले असून श्रीरामपूर नगरपरिषदेचे ३ माजी उपनगराध्यक्ष व अनेक माजी नगरसेवकांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात उपमुख्यमंत्री अजित दादा यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे
श्रीरामपूर नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष रवींद्र गुलाटी, मा राजेश अघ,मोहंमद शेख, सलीम शेख यांच्यासह
अशोक बँकेचे मा.संचालक महाराज कंत्रोड,जय मातादी पतसंस्थाचे संचालक अनिल (बंटी) गुप्ता,कमालपूर गुरुद्वाराचे ट्रस्टी भगवंत सिंग बत्रा,प्रशांत अलग,सचिन गुलाटी, नीरज त्रिपाठी ,गणेश वर्मा , राकेश सहानी, बंटी थापर, चेतन जग्गी ,प्रदीप गुप्ता नामदेव अस्वर ,नासिर शेख, गणेश गायकवाड,मदन कणघरे,
सुनील परदेशी, रोहित भाऊ गुलदगड,प्रशांत यादव,अशोक गायकवाड आदींसह असंख्य प्रमुख पदाधिकारी यांनी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा .अजित दादा पवार यांच्या उपस्थित पक्ष प्रवेश केला आहे.
यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ हे माझ आजोळ असून तेथील उद्योग व्यवसाय ,व्यापार वाढीस लागावा तसेच नवनवीन उद्योग यावेत यासाठी माझी मदत राहील व सर्व तो परीने मदत होईल , आमदार लहू कानडे यांनी उत्तम काम केले असून त्यांच्या विजय घडवून तालुक्याच्या विकासाला साथ द्यावी असे अजित पवार यावेळी सांगितले.
प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अविनाश आदिक, आ.लहू कानडे यांनी सर्व पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत