देवळाली प्रवरा(वेबटीम) श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार हेमंत भुजंगराव ओगले यांच्या राहुरी तालुक्यातील देवळाली प्र...
देवळाली प्रवरा(वेबटीम)
श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार हेमंत भुजंगराव ओगले यांच्या राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा सह ३२ गावे प्रचार संपर्क कार्यालयाचे उद्घाटन देवळाली प्रवरा येथे आज संपन्न झाले.
हेमंत ओगले यांनी श्रीरामपूर शहर व तालुका तसेच देवळाली प्रवरातील ३२ गावात प्रचारास प्रारंभ केला असून वयक्तिक भेटीगाठी वर हेमंत ओगले भर देत आहेत. जिल्हा बँक संचालक करण ससाणे, सचिन गुजर, बाबासाहेब दिघे, प्रशांत ओगले, दीपाली ससाणे, निधी ओगले यांसह शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे पदाधिकारी मतदारसंघ पिंजून काढत आहे.
देवळाली प्रवरातील महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन प्रचार प्रारंभ केला आहे. आज देवळाली प्रवरा शहरात महाविकास आघाडीचे उमेदवार हेमंत ओगले यांचे कार्यालय सुरू करण्यात आले असून पदयात्रा काढून मतदारांशी संवाद साधण्यात आला आहे.
याप्रसंगी नानासाहेब पठारे, बाबाकाका देशमुख, बाळासाहेब मुसमाडे, अरुण खुरूद, अरुण दुस, भोळे मामा, अन्सार इनामदार, बाळासाहेब खुरूद, दत्तात्रय कडू, प्रभाकर महांकाळ, भागवत मुंगसे, उत्तमराव कडू, सतिश वाळुंज, बाळासाहेब खांदे, वैभव गिरमे, दिपक पठारे, कृष्णराव मुसमाडे, सुखदेव होले, वसंत कदम ,नानासाहेब मुसमाडे , प्रशांत कराळे कुणाल पाटील, मयूर आडागळे, फिरोज शेख, विश्वास पाटील, भाऊसाहेब गुंजाळ, दत्तात्रय कदम, आप्पासाहेब झगडे, प्रशांत ओगले, विठ्ठल पठारे तसेच महाविकास आघाडी व मित्र पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तथा शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत