चिंचोली येथील प्रवरातून होणारा अवैध वाळू उपसा बंद करा - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

चिंचोली येथील प्रवरातून होणारा अवैध वाळू उपसा बंद करा

राहुरी(प्रतिनिधी) राहुरी तालुक्यातील चिंचोली प्रवरा येथील  नदी पात्रातून  होणारा अवैध वाळू उपसा बंद करावा या मागणीसाठी एकलव्य संघटनेच्या वती...

राहुरी(प्रतिनिधी)



राहुरी तालुक्यातील चिंचोली प्रवरा येथील  नदी पात्रातून  होणारा अवैध वाळू उपसा बंद करावा या मागणीसाठी एकलव्य संघटनेच्या वतीने तहसीलदार नामदेव पाटील यांना निवेदन देण्यात आले.


दिलेल्या निवेदनात म्हंटले की,  चिंचोलीमधील वाळू उपसा हा कुठलाही लिलाव अथवा शासकीय डेपो नसतानाही सु‌द्धा आठ ते दहा महिन्यापासून वाळू उपसा होत आहे.  सदरचा वाळू उपसा हा आदिवासी दफन भूमीतून होत आहे.दफनभूमी शेजारील गट नं. ४१४ खाते नं. ४४३ या गट नं मधून स्वतःच्या हितासाठी सदरील वाळू उपसा करीत आहे. तसेच आमच्या आदिवासी दफन भूमीतील (कबरीवरून) गाडी चालून राजरोसपणे वाळू उपसा करत आहे. तसेच चिंचोली मधील अनाधिकृत वाळू उपसा बंद करून प्रशासनाने सहकार्य करावे. तरी प्रशासनाने योग्य ती कार्यवाही करून सदरील गट नंबरचा पंचनामा करून गट मालकावर योग्य ती कार्यवाही करण्यात यावी सदर कार्यवाही न झाल्यास उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.



या निवेदनावर एकलव्य संघटना प्रणित टायगर फोर्सचे तालुकाध्यक्ष नानासाहेब बर्डे, युवा तालुकाध्यक्ष विशाल बर्डे, कान्हा बर्डे, नंदू शिंदे, विलास डुक्रे आदिंसह कार्यकर्ते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत