देवळाली प्रवरा(वेबटीम) राहुरी पंचायत समितीच्या शिक्षण विभागामार्फत तालुकास्तरीय विविध गुणदर्शन व सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धा देवळाली प्रवर...
देवळाली प्रवरा(वेबटीम)
राहुरी पंचायत समितीच्या शिक्षण विभागामार्फत तालुकास्तरीय विविध गुणदर्शन व सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धा देवळाली प्रवरा येथील श्री समर्थ बाबुराव पाटील सांस्कृतिक भवन येथे उत्साहात संपन्न झाल्या.
या सांस्कृतिक कार्यक्रम उद्घाटन समारंभासाठी माजी आमदार चंद्रशेखर कदम, मुख्याधिकारी विकास नवाळे, मंत्रालयातील सेवानिवृत्त सचिव दत्तात्रय कडू, माजी नगराध्यक्ष गोरख मुसमाडे, सामाजिक कार्यकर्ते अजीज शेख, जीएमसीचे अध्यक्ष जालिंदर मुसमाडे,सौ. बोरकर, शिक्षण विस्तार अधिकारी सुमन सातपुते, इंदूमती घट, शोभा कोळसे, केंद्रप्रमुख नीलिमा गायकवाड, सरस्वती खराडे, विद्या भागवत, संतोष गुलदगड, मुख्याध्यापक, शिक्षक वृंद व पालक उपस्थित होते.प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धेचे फित कापून व सरस्वतीपूजनाने उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी जि.प.शाळा आंबी व देवळाली प्रवरा यांच्या लेझिम पथकाने लक्ष वेधून घेतले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्रप्रमुख सरस्वती खराडे यांनी केले. याप्रसंगी बोलताना चंद्रशेखर कदम म्हणाले की , स्पर्धांतून मुलांच्या सुप्तकलागुणांना वाव मिळतो. मुले कलात्मक अविष्कारातून अभिनय कला जोपासत असल्याचे ते म्हणाले.
शिक्षणाधिकारी मोहनिराज तुंबारे विशेष संयोजनातून कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षण विस्तार अधिकारी सुमन सातपुते, केंद्रप्रमुख नीलिमा गायकवाड, सरस्वती खराडे, मुख्याध्यापक सुनंदा तांबे, बबन गाडेकर, स्पर्धाप्रमुख संतोष गुलदगड, शिक्षक लोखंडे सर, आमले सर, हसन शेख, अरुण उबाळे, प्रफुल्ल पाटील, आसिफ सर, हरिश्चंद्र सोनवणे, देशपांडे मॅडम, मनिषा गायकवाड, राणी ठाकूर, मुझन शेख यांनी अथक परिश्रम घेतले.
सुत्रसंचालन हरिश्चंद्र सोनवणे व राहुल खराडे यांनी तर आभार नीलिमा गायकवाड यांनी मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत