श्रीरामपूर(वेबटीम) श्रीरामपूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष अनिलराव शामराव कांबळे यांचे आज ४ डिसेंबर रोजी निधन झाले. अनिलराव कांबळे यांच्या...
श्रीरामपूर(वेबटीम)
श्रीरामपूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष अनिलराव शामराव कांबळे यांचे आज ४ डिसेंबर रोजी निधन झाले.
अनिलराव कांबळे यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून अहिल्यानगर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पार्थिवावर उद्या गुरुवार ५ डिसेंबर रोजी सकाळी ९ वा.श्रीरामपूर शहरातील अमरधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन भाऊ, एक मुलगा, सुना, पुतणे, नातवंडे असा परिवार आहे.
माजी नगरसेविका भारती कांबळे यांचे ते पती तर कुणाल कांबळे यांचे वडील तर श्री.शिवाजी, सुनील व उदय कांबळे यांचे बंधू व समीर, तारक, महेश, गौरव व अमोल कांबळे यांचे चुलते होत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत