राहुरी/वेबटीम:- राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा नगरपरिषदेचे माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष तथा राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तसेच भ...
राहुरी/वेबटीम:-
राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा नगरपरिषदेचे माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष तथा राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तसेच भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सदस्य सत्यजित चंद्रशेखर पा. कदम यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त आज बुधवार दि. ४ डिसेंबर रोजी दुपारी ३ वा. देवळाली प्रवरा येथील छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय या ठिकाणी महाराष्ट्रातील प्रसिद्ध व्याख्याते गणेशजी शिंदे यांचे शालेय विद्यार्थी व पालकांसाठी व आजच्या काळात भेडसावणाऱ्या ज्वलंत विषयावर प्रबोधन पर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
तरी या व्याख्यानाचा देवळाली प्रवरा व परिसरातील विद्यार्थ्यांनी व पालकांनी लाभ घ्यावा असे आवाहन सत्यजित कदम फाउंडेशन यांच्या वतीने करण्यात आले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत