नेवासा(वेबटीम) नेवासा तालुक्यातील शिरेगाव येथे वडिलांच्या निधनाच्या धक्क्याने दुसर्या दिवशी ९ वर्षीय मुलीने प्राण सोडल्याची घटना घडली.या घ...
नेवासा(वेबटीम)
नेवासा तालुक्यातील शिरेगाव येथे वडिलांच्या निधनाच्या धक्क्याने दुसर्या दिवशी ९ वर्षीय मुलीने प्राण सोडल्याची घटना घडली.या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
शिरगाव येथील बाळासाहेब गेणदास जाधव (वय-३८) हे किडनीच्या आजाराने अहिल्यानगरनगर येथील खाजगी हॉस्पीटलमध्ये उपचार घेत असताना शुक्रवारी झाले. वडीलांच्या निधनाचा धसका त्यांच्या ९ वर्षीय कन्या श्रद्धा हिने घेतला व तिला श्रीरामपूर येथील हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र दरम्यान उपचारादरम्यान तीचेही निधन झाले.
श्रद्धा ही शिरेगाव येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत इयत्ता तिसरीमध्ये शिकत आहे. बाप-लेकीच्या निधनाच्या या घटनेमुळे मुळाकाठ परिसरात शोक व्यक्त केला जात आहे. बाळासाहेब शेतकरी कुंटुबातील असून शेती व्यवसाय करत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, आई व दोन भाऊ असा परिवार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत