देवळाली प्रवरा/वेबटीम:- रक्तदानामुळे रुग्णांना जीवदान मिळाते. गंभीर परिस्थितीत रक्ताची कमतरता भासू नये. शहरातील एकही रूग्न रक्तापासुन वंचीत ...
देवळाली प्रवरा/वेबटीम:-
रक्तदानामुळे रुग्णांना जीवदान मिळाते. गंभीर परिस्थितीत रक्ताची कमतरता भासू नये. शहरातील एकही रूग्न रक्तापासुन वंचीत राहु नये म्हणून जामा म्हस्जिद वक्फ कमीटीने घेतलेला सामाजिक उपक्रम अत्यंत स्तुत्य असल्याचे प्रतिपादन माजी सनदी अधिकारी दत्तात्रय कडू यांनी केले.
इदगा म्हस्जिद वक्फ कमीटीने घेतलेला रक्तदान शिबीराच्या ऊदघाटन प्रसंगी ते बोलत होते.
रक्तदान शिबीराचे हे सलग दुसरे वर्ष असुन यावेळी खालिद शेख,नाट्य कलावंत संजय , हुडे, देवळाली प्रवरा विविध कार्यकारी सोसायटीची माजी संचालक अजित भाई चंदुलाल शेख,अजिज शेख,आदिल पठाण,रियाज शेख आदी उपस्थित होते. अहिल्या नगर येथील जनकल्याण रक्त केंद्राने रक्त संकलन केले. शहरातील ३० युवकांनी रक्तदाननात सहभाग नोंदविला. रक्तदात्यांना प्रमाणपत्र व अल्पोपहार देन्यात आला. जनकल्याण रक्तकेंद्राच्या वतीने डाॅ.विना फुके,डाॅ.शरद बळें, मनिषा जोशी,प्रिती चीपाडे, सुलभा पवळ आदि उपस्थित होते.तर इदगा मशीद वक्फ कमिटीच्या वतीने अजिज शेख,जावेद शेख.हुसेन शेख,शोवेब शेख, समिर शेख, आयुब पठाण,आदिल पठाण, रिझवान शेख,फैसल पठाण,साद शेख आदि उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत