धोकादायक खड्डे व उखडलेले रस्ते अपघातांसाठी कारणीभूत : अहिरे - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

धोकादायक खड्डे व उखडलेले रस्ते अपघातांसाठी कारणीभूत : अहिरे

श्रीरामपूर(वेबटीम) शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, सय्यद बाबा चौक, महात्मा गांधी चौक येथील सिग्नल यंत्रणा पूर्णपणे बंद पडलेली असल्याने चौ...

श्रीरामपूर(वेबटीम)



शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, सय्यद बाबा चौक, महात्मा गांधी चौक येथील सिग्नल यंत्रणा पूर्णपणे बंद पडलेली असल्याने चौका-चौकांमध्ये मोठ्या प्रमाणात अपघात घडत आहेत. तरी नगरपरिषदेने शहरातील रखडलेली रस्त्यांची कामे करून खड्डे मुक्त श्रीरामपूर करावे अशी मागणी बहुजन समाज पक्षाचे उत्तर नगर जिल्ह्याचे महासचिव प्रकाश अहिरे यांनी केली आहे. या आशयाचे निवेदन अहिरे यांनी प्रशासक प्रांताधिकारी, तहसीलदार व मुख्याधिकारी यांना दिले आहे. त्यात म्हंटले आहे की, श्रीरामपूर शहरारांतील रस्त्यांचे मजबुतीकरण व डांबरीकरण करावे, त्यावर पांढरे प‌ट्टे मारावेत, बंद पडलेली सिग्नल यंत्रणा कार्यान्वीत करून अपघातांना आळा घालावा अशी मागणी केली आहे.

श्रीरामपूर शहरातील अंतर्गत व बाह्य रस्त्यांची अवस्था दयनीय झालेली असून रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता हे समजेनासे झाले आहे. परंतु श्रीरामपूर नगरपरिषदेस याचे काहीही देणेघेणे नाही. संगमनेर-नेवासा रस्तावरून पायी चालणेही मुश्कील झाले आहे. या रस्त्यावर मागील काही दिवसांपासून अपघातांची मालिकाच सुरु झाली आहे. सध्या ऊस गळीत हंगाम सुरु असल्याने या रस्त्याने ऊस वाहतुक करणारे ट्रॅक्टर दोन ट्रॉल्यांवर ऊस वाहतुक करताना दिसतात. या रस्त्यावर भयंकर असे खड्डे असल्यामुळे मागून येणा-या वाहनधारकांना या खड्ड्डयांचा अंदाज येत नाही व वाहन पुढे नेत असतांना अचानकपणे खड्डा चुकवितांना व एखादा पादचारी रस्त्यावरुन जाताना त्यास या वाहनाची धडक बसून मोठा अपघात होतो. पंधरा दिवसांत मागणीची पूर्तता न झाल्यास बहुजन पार्टी मोठे आंदोलन हाती घेईल. या दरम्यान कायदा व सुव्यस्व्यास्थाबाबत परिस्थिती निर्माण झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी नगरपरिषद प्रसासानाची राहील असा इशारा अहिरे यांनी दिला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत