पानेगांव (वार्ताहर) पोटासाठी अन्न उगवते ती माती, पाण्यालाही चव देते ती माती, रूप तीचे मैलामैलांवर बदलत जाते ती माती , जोडते जन्मांची नाळ अशी...
पानेगांव (वार्ताहर)
पोटासाठी अन्न उगवते ती माती, पाण्यालाही चव देते ती माती, रूप तीचे मैलामैलांवर बदलत जाते ती माती , जोडते जन्मांची नाळ अशी ती माती जागतिक मृदादिनानिमित्ताने महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न मुळा शिक्षण संस्थेचे कृषी महाविद्यालय सोनई येथील कृषिकन्यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पानेगांव (ता नेवासे) जागतिक मृदा दिन साजरा करण्यात आला.
यावेळी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी कृषिकन्यांनी चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून लाभलेल्या पानेगावच्या लोकनियुक्त सरपंच सौ.निकिता भोसले ,उपसरपंच दत्तात्रय घोलप, पत्रकार संघटनेचे जिल्हाप्रमुख बाळासाहेब नवगिरे कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक दहिफळे सर उपमुख्याध्यापक श्री. खेमनार सर, श्री. ढेहरे सर, सौ. देठे मॅडम व इतर ग्रामस्थ उपस्थित होते. सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.आपला देश हा कृषीप्रधान देश आहे आणि मृदा संवर्धन करणे ही आपली जबाबदारी आहे.
मृदा संवर्धनाकडे सर्वांचं लक्ष वेधून घेण्यासाठी जगभरात मृदा दिन साजरा केला जातो.माती ही निसर्गाची अमुल्य देणगी आहे आणि तिचे जतन करणे हे आपले कर्तव्य आहे . असे मार्गदर्शन उपसरपंच घोलप यांनी केले. यानंतर चित्रकला स्पर्धेचे बक्षिस वितरण उपस्थितांच्या हस्ते करण्यात झाले. यामध्ये पहिली व दुसरीतून तीन क्रमांक आणि तिसरी व चौथीतून तीन क्रमांक काढण्यात आले. यामध्ये प्रथक क्रमांक यश जंगले व आपुलकी जंगले ,द्वितीय क्रमांक तेजल चिंधे व ऐश्वर्या चिंधे, तृतीय क्रमांक अवनी भांड व अन्वी जंगले यांना बक्षिस वितरण करण्यात आले. यानंतर आभारप्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.
प्राचार्य डॉ. एच. जी. मोरे, उपप्राचार्य डॉ. एस. व्ही बोरुडे, कार्यक्रम समन्वयक डॉ. अतुल ए. दरंदले, कार्यक्रम अधिकारी प्रा. आर. टी दिघे, प्रा. आर. एस. गोंधळी, प्रा. जे. एस वाघमारे, प्रा. डॉ. एस. बी. चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली कृषिकन्या प्रणवी सानप, निकिता शिरोळे, प्राजक्ता खुणे, पुजा सातव, आरती सोळंकी, कोमल साळुंके यांनी हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत