राहुरी फॅक्टरी(वेबटीम) राहुरी फॅक्टरी येथील नगर मनमाड मार्गानजीक असलेल्या चिंचविहिरे ग्रामपंचायत हद्दीतील गिते वस्तीवर बिबट्याने अक्षरशः ध...
राहुरी फॅक्टरी(वेबटीम)
राहुरी फॅक्टरी येथील नगर मनमाड मार्गानजीक असलेल्या चिंचविहिरे ग्रामपंचायत हद्दीतील गिते वस्तीवर बिबट्याने अक्षरशः धुमाकूळ घातला असून दोन दिवसात तब्बल ३ शेळ्या व एक बोकड बिबट्याने फस्त केले असल्याने परिसरातील शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे.
गिते वस्ती येथील शेतकरी सोमनाथ बाळासाहेब गिते यांच्या घरासमोर बिबट्याने येऊन एक बोकड फस्त केला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी परत बिबट्याने येऊन शिवाजी गीते यांच्या ४ शेळ्यांवर हल्ला करून त्यांना ठार केले.
बिबट्याच्या हल्ल्यानंतर वन विभागाने घटनास्थळी येऊन पंचनामा केला आहे. मात्र या भागात दररोज बिबट्याचे दर्शन होत असून पाळीव प्राण्यांवरील हल्ले वाढत चालले आहेत. त्यामुळे शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाने तातडीने पिंजरा लावावा अशी मागणी गीते वस्ती परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत