देवळाली प्रवरा नगरपरिषदेला जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवात विविध पारितोषिके मुख्याधिकारी विकास नवाळे काव्यवाचन, चारोळी आणि प्रहसन स्पर्धांमध्ये प्रथम - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

देवळाली प्रवरा नगरपरिषदेला जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवात विविध पारितोषिके मुख्याधिकारी विकास नवाळे काव्यवाचन, चारोळी आणि प्रहसन स्पर्धांमध्ये प्रथम

देवळाली प्रवरा/वेबटीम:- नगरविकास विभाग आणि नगरपरिषद प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव २०२४ मध्य...

देवळाली प्रवरा/वेबटीम:-

नगरविकास विभाग आणि नगरपरिषद प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव २०२४ मध्ये देवळाली प्रवरा नगरपरिषदेने विविध स्पर्धांमध्ये उत्कृष्ट यश संपादन केले. हा महोत्सव २७ ते २९ डिसेंबर २०२४ दरम्यान राहुरी विद्यापीठात  पार पडला.

दिनांक ०८ जानेवारी २०२५ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील पंडित जवाहरलाल नेहरू सभागृहात पारितोषिक वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ,अहिल्यानगर जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरकर साहेब, अहिल्यानगर महानगरपालिका आयुक्त यशवंत डांगे, जिल्हा सहआयुक्त प्रशांत खांडकेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

देवळाली प्रवरा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विकास नवाळे यांनी काव्यवाचन, चारोळी आणि प्रहसन यांसारख्या स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांक पटकावून विशेष यश मिळवले. तसेच, नगरपरिषद लिपिक अश्विनी भांगरे यांनी बॅडमिंटनमध्ये प्रथम क्रमांक मिळवला.

याव्यतिरिक्त, मुख्याधिकारी विकास नवाळे, कार्यालय अधीक्षक तुषार सुपेकर, लेखापाल स्वप्नील फड, संगणक अभियंता भूषण नवाल, स्थापत्य अभियंता दिनकर पवार, अग्निशमन अधिकारी गोपाल भोर, बबन दिवे, विशाल खलसे आणि उदय इंगळे यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांनी समूह नृत्य, समूह गायन आणि प्रहसन यांसारख्या सांघिक स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत पारितोषिके जिंकली. ग्रंथपाल संभाजी वाळके, भरत साळुंके, सुदाम कडू, विजय साठे, कृष्णा महंकाळ, अशोक पंडित, अभिषेक सुतावणे, भूषण झरकर, राजेंद्र कदम, अरुण कदम, गोरख भांगरे, अजय कासार, राजेद्र हरगुडे, राजेंद्र पोकळे, बाळासाहेब भोंडगे आणि इतर कर्मचाऱ्यांनी क्रिकेट, रस्सीखेच, धावणे, गोळाफेक, थाळीफेक आणि भालाफेक यांसारख्या क्रीडा स्पर्धांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत